भंडारा - एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच 19 एप्रिल हा दिवस भंडारा जिल्ह्यातील लोकांसाठी दिलासादायक ठरला आहे. सोमवारी पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. 1207 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 833 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 25 हजार 400 झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 38 हजार 432 झाली आहे. सध्या 12 हजार 452 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.09 टक्के आहे.
1596 चा गाठला होता उच्चांक
भंडारा जिल्हा सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा आठवा नंबरचा हॉटस्पॉट ठरलेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये 12 तारखेला भंडारा जिल्ह्यात 1596 कोरोना रुग्ण आढळले होते. आजपर्यंतचा हा उच्चांक होता. त्यानंतर हळूहळू ही संख्या कमी होत राहिली. मात्र, सरासरी बाराशे एवढी रुग्ण संख्या दररोज येत होती. त्याउलट बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही खूप कमी होती. मात्र 19 एप्रिल सोमवार हा दिवस भंडारा जिल्ह्यावाशीयांसाठी एक दिलासादायक ठरला. सोमवारी बाराशे सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर 833 नवीन करून पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आतापर्यंत बरे झालेली रुग्णसंख्या 25 हजार 400 असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 38432, तर सध्या सक्रिय रुग्णसंख्या 12 हजार 452 एवढी आहे. दिवसभरात 21 मृत्यू झाले असून एकूण मृत्यू संख्या 580 एवढी आहे. सध्या रुग्ण रिकव्हरी रेट 66.09 टक्के तर मृत्यू दर 01.51 एवढा आहे.
कोणत्या तालुक्यात किती रुग्ण आढळले
भंडारा तालुका 347, मोहाडी 81, तुमसर 115, पवनी 54, लाखनी 92, साकोली 92 व लाखांदुर तालुक्यातील 52 व्यक्तीचा समावेश आहे.
हेही वाचा - 'फडणवीसांनी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी दिल्लीत बसावे' - महसूल मंत्री बाळासाहोब थोरात