बीड - शहरातील बार्शी नाका येथील पोलीस चौकीसमोर एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्या तरुणाची ओळख अद्यापपर्यंत पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पोलीस चौकीसमोर मृतावस्थेतील एक २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. हा प्रकार नेमका काय आहे? याचा उलगडा झालेला नाही. रविवारी पोलीस चौकी बंद होती. यादरम्यानच चौकीच्या समोरील बाजूस मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे बीड शहरात खळबळ उडाली असून तो मृतदेह कोणाचा? त्या तरुणाचा मृत्यू कशाने झाला? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.