ETV Bharat / state

किल्ले धारूर परिसरात अपघाताची मालिका सुरूच, चारचाकीने पादचाऱ्यास चिरडले - Beed District Latest News

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून, काल शुक्रवारी सकाळी कार व दुचाकीच्या अपघातात एक ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच, शुक्रवारी मध्यरात्री शहरातील माजलगाव रोडवर एस्सार पेट्रोल पंपाजवळ एका पादचाऱ्यास कारने उडवले. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

चारचाकीने पादचाऱ्यास चिरडले
चारचाकीने पादचाऱ्यास चिरडले
author img

By

Published : Mar 13, 2021, 3:31 PM IST

किल्ले धारूर- गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून, काल शुक्रवारी सकाळी कार व दुचाकीच्या अपघातात एक ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच, शुक्रवारी मध्यरात्री शहरातील माजलगाव रोडवर एस्सार पेट्रोल पंपाजवळ एका पादचाऱ्यास कारने उडवले. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

आरणवाडी जवळील घाटात शुक्रवारी सकाळी कार आणि दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये एक जण ठार तर तीन जण जखमी झाले होते. घटनेला काही तास होत नाही, तोच रात्री शहरात पुन्हा एक अपघात झाला आहे. मध्यरात्री शहरातील माजलगाव रोडवर एस्सार पेट्रोल पंपाजवळ एका पादचाऱ्यास कारने उडवले. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरेश माणिक माळेकर (29) रा. गोपाळपूर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघाताबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताचे सत्र सुरूच

दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 548 वर अपघाताचे सत्र सुरूच आहे. अंबेवडगाव येथे 4 मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघात होऊन, एक तरुण ठार झाला होता. तर गुरुवारी तेलगाव येथे ट्रकने महिलेला चिरडल्याची घटना घडली होती. त्यात आज पुन्हा एक अपघात घडला आहे.

हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझे अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.