ETV Bharat / state

बीड : पैलवान मुरलीधर मुंडे 'विशेष गौरव' पुरस्काराने सन्मानित - बीड ताज्या बातम्या

पैलवान मुरलीधर मुंडे यांना मराठवाडा साथीच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा 'विशेष गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

wrestler Muralidhar Munde honored with Special Pride award in beed
बीड : पैलवान मुरलीधर मुंडे 'विशेष गौरव' पुरस्काराने सन्मानित
author img

By

Published : Feb 7, 2021, 3:36 PM IST

परळी वैजनाथ (बीड) - येथील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पैलवान मुरलीधर मुंडे यांना मराठवाडा साथीच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा 'विशेष गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुरलीधर मुंडे यांचा सत्कार

यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित -

जयहिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पैलवान मुरलीधर भागवतराव मुंडे यांनी व्यायाम शाळेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापूर्वी ही त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यामध्ये एकता गौरव पुरस्कार, राजस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार, राज्यस्तरीय कुस्तीभूषण पुरस्कारांचा समावेश आहे. हा पुरस्कार मिळाल्याने माझा उत्साह वाढला असल्याचे त्यांनी पुरस्कार स्विकाताना म्हटले.

असे आहे पुरस्काराचे स्वरूप -

सामाजिक, शैक्षणिक, दुग्धव्यवसाय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मराठवाडा साथीच्यावतीने दरवर्षी 'विशेष गौरव' पुरस्कार देण्यात येतो. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असते.

हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यात बर्डफ्लूचा शिरकाव; साडेनऊ लाख कोंबड्याची लावणार विल्हेवाट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.