बीड : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हे वाढत आहेत. अनेकवेळा पोलीस प्रशासन यावर कठोर कारवाई करत आहे. मात्र जे गुन्हेगार आहेत त्यांना मात्र चाप बसताना दिसत नाही. या घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील जो हिंगोली पॅटर्न आहे, तो बीड जिल्ह्यात राबवला पाहिजे. तर जनजागृतीच्या माध्यमातून महिला, मुली व समाज माध्यमांना दाखवले पाहिजे. असे गुन्हे केल्यानंतर आपल्यावर होणारी कार्यवाही व भविष्यात येणाऱ्या अनेक अडचणी याला आपल्याला कसे सामोरे जावे लागते.
बलात्काराचे प्रकार : बीड जिल्ह्यात कोणत्या महिन्यात किती बलात्काराचे प्रकार घडले आहेत. 2022 जानेवारी- 11 19, फेब्रुवारी - 09 22, मार्च - 07 31, एप्रिल - 17 34, मे - 12 31, जून - 14 35, जुलै - 07 23, ऑगस्ट - 13 20, सप्टेंबर - 08 24, ऑक्टोबर- 12 25, नोव्हेंबर - 16 24, डिसेंबर - 13 24, जानेवारी - 01 10, फेब्रुवारी- 01 असे एकूण 140 322 घटना आहेत. एवढ्या गुन्ह्यांची नोंद पोलीसात झाली आहे. त्यामुळे आता महिला आणि मुली घरातही आणि घराच्याही बाहेर असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
काय म्हणतात महिला आयोग सदस्या: बीड जिल्ह्यात काही दिवसापासून महिला व मुलीवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या 13 महिन्यांमध्ये अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्या अत्यंत भयंकर आहेत. बीडमध्ये या कालावधीत जवळपास 322 विनयभंगाच्या तक्रारी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाले आहेत. तर 140 बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
हिंगोली पॅटर्न जिल्ह्यात राबवा: महिला आयोगाच्या सदस्या यांनी सांगितले की, हिंगोली पॅटर्न बीड जिल्ह्यात राबवला पाहिजे. त्या हिंगोली पॅटर्नमध्ये अशा काही गोष्टी आहेत की, बालविवाहाचे प्रमाण असेल किंवा छेडछाडीचे प्रमाण असेल, त्यामध्ये हुंडाबळी, हे जननी अभियान प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये व प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावर जाऊन पोलीस प्रशासनाने राबवले पाहिजे. हे अभियान प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. तर कुठेतरी महिला वरील व मुलीवरील अन्यायाच्या घटना कमी होतील. आयोगाच्या वतीने जिल्ह्यातील माता-भगिनींना असे केले आव्हान आहे की, तुमच्यावर जे अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्या घटना आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगितल्या पाहिजे. त्या दाबून ठेवता त्या उघड केल्या पाहिजेत. जेणेकरून त्या अत्याचार करणाऱ्या वर योग्य ती कार्यवाही करता येईल.
काय म्हणतात पोलीस अधीक्षक: पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी सांगितले की, महिलांचे जे गुन्हे आहेत ते आम्ही दाखल करून घेण्याचे काम करत आहोत. महिला वरील जे 354 व 378 498 च्या केसेस आहेत, हे सर्व गुन्हे आम्ही दाखल करून त्याच्या मागे जे आरोपी आहेत, त्यांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करत आहोत. आमचे यांच्या विषयी एक चिडीमार पथक सुद्धा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोलिंग करून महिला व मुलींची छेड होणार नाही. याच्यासाठी आम्ही दखल घेत आहोत. जे काही अशी मुले आहेत ते मुलींना व महिलांना त्रास देत आहेत, अशावर डीपी ॲक्ट प्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करत असतो असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.