ETV Bharat / state

मनरेगाच्या कामात गैरप्रकार; महिला सरपंचाने हाणून पाडला चौकशी दडपण्याचा डाव - बीड उपजिल्हाधिकारी

सरपंच प्रभावती कांबळे यांच्या नावे गैरप्रकार केलेल्या प्रकरणात कोणतीही तक्रार नसल्याचा अर्ज देण्यात आला. मात्र पुढच्याच दिवशी त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला जबाब नोंदवला जात नसल्याचे सांगत चौकशीची मागणी केली.

beed sarpanch news
महिला सरपंचाने हाणून पाडला चौकशी दडपण्याचा डाव, खोट्या सह्यांच्या शपथपत्राचा 'पर्दाफाश'
author img

By

Published : Sep 3, 2020, 9:08 AM IST

बीड - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील 'मनरेगा' योजनेच्या कामात झालेल्या गैरप्रकार झाला होता. मात्र, याबाबत कोणाचीच तक्रार नसल्याचे भासवून चौकशी दडपण्याचा डाव महिला सरपंचाने हाणून पाडला आहे. प्रभावती कांबळे असे या सरपंचाचे नाव आहे.

मंगळवारी कांबळे यांच्या नावे गैरप्रकार केलेल्या प्रकरणात कोणतीही तक्रार नसल्याचा अर्ज देण्यात आला. मात्र बुधवारी त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला जबाब नोंदवला जात नसल्याचे सांगत चौकशीची मागणी केली.

अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा योजनेतून झालेल्या कामासंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्याची चौकशी मनरेगाच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. मंगळवारी याची सुनावणी होती. मात्र सुनावणी दरम्यान ज्यांनी तक्रार केली होती, त्यांच्या नावे एक नोटरी केलेले शपथपत्र तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. त्यामध्ये 'आमची कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्यावेळी सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या महिला सरपंचाचा जबाब नोंदवण्यात आला नाही. ज्याच्या विरोधात तक्रार होती, त्या गुत्तेदारी करणाऱ्या एका शिक्षकाने या महिलेला जबाब देण्यापासून अडवले. हे सारे होत असताना तक्रार निवारण अधिकाऱ्यांनी बघ्यांची भूमिका घेतली.

यानंतर बुधवारी सरपंच प्रभावती कांबळे यांनी आमदार संजय दौंड यांच्याशी संपर्क करून त्यांना सारा प्रकार सांगितला. त्यांनी मनरेगा उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांना संबंधित प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सरपंच प्रभावती कांबळे यांनी आपल्या नावे दाखल केलेले शपथपत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणात चौकशीची आवश्यकता असल्याचा जबाब नोंदवला.

काय आहे प्रकरण ?

2014 मध्ये पट्टीवडगाव मध्ये तहसील यंत्रणेमार्फत मनरेगाअंतर्गत एका रस्त्याचे काम झाले आहे. या रस्त्याचे अंदाजपत्रक लातूर जिल्ह्याच्या हद्दीतील आहे. तसेच या कामावर काही मयत व्यक्ती, शिक्षक, दिव्यांग, एसटी कर्मचारी देखील मजूर म्हणून दाखवण्यात आल्याची तक्रार आहे. या साऱ्या प्रकरणामागे एका शिक्षकाचाच हात असल्याचे सांगितले जाते.

नोटरी कशी झाली ?

मंगळवारी तक्रार निवारण अधिकाऱ्यांसमोर जे शपथपत्र दाखल करण्यात आले, त्यावर तीन व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र सरपंच प्रभावती कांबळे यांनी आपली सही बनावट असल्याचे आणि आपण असे कोणातही शपथपत्र दिले नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मंगळवारी दाखल करण्यात आलेले शपथपत्र अंबाजोगाईत नोटरी करण्यात आले आहे. मग जर सरपंच प्रभावती कांबळे यांचा दावा खरा असेल तर व्यक्ती उपस्थित नसताना नोटरी झाली कशी, हा प्रश्न देखील कायम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.