ETV Bharat / state

कोरोनाविरुद्ध लढा: पत्नीची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा... - बीड कोरोना बातमी

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काटे यांच्या पत्नी मनीषा विजय काटे या बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांची पेन्शन त्यांचे पती राजेंद्र काटे यांना मिळते. सध्या कोरोनाचे राज्यात मोठे संकट आहे. त्यामुळे या संकटाशी लढण्यासाठी राजेंद्र काटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पत्तीच्या एका महिन्याची पेन्शनची जमा केली आहे.

wifes-pension-deposited-in-cm-relif-fund-dot-dot-dot
पत्नीची पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा...
author img

By

Published : Apr 3, 2020, 1:11 PM IST

बीड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी आर्थिक मदत करा, असे आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारनेही केले आहे. त्यानंतर अनेक उद्योजन, कलाकार, व्यापारी, कंपन्या, संस्था, देवस्थाने तसेच दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली आहे. मात्र, एका सामान्य व्यक्तीनेही आपल्या पत्नीची एक महिन्याची पेन्शन कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.

पत्नीची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा...

हेही वाचा- 'हिंदू-मुसलमान' खेळ मांडणाऱ्यांच्या हाती आयते कोलीत!

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काटे यांच्या पत्नी मनीषा विजय काटे या बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. तीन वर्षांपुर्वी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांची पेन्शन त्यांचे पती राजेंद्र काटे यांना मिळते. सध्या कोरोनाचे राज्यात मोठे संकट आहे. त्यामुळे या संकटाशी लढण्यासाठी राजेंद्र काटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पत्तीच्या एका महिन्याची पेन्शची जमा केली आहे. लोकप्रतिनिधी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन राजेंद्र काटे यांनी केले आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.