ETV Bharat / state

परळीत पतीसाठी पत्नी 'डोअर टू डोअर'; राजश्री धनंजय मुंडे यांच्या जनसंपर्क दौर्‍याने चर्चेला उधाण

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांनी आपली तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केली आहे. याचाच एक भाग म्हणजे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना देखील जनसंपर्क दौऱ्यामध्ये उतरवले आहे.

राजश्री धनंजय मुंडे यांचा जनसंपर्क दौरा
author img

By

Published : Aug 1, 2019, 11:40 PM IST

बीड - काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय नेते मोर्चेबांधणी करत आहेत. राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये नणंद पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना शह देण्यासाठी वहिनी म्हणजेच राजश्री धनंजय मुंडे जनसामान्यांमध्ये उतरल्या आहेत. पती धनंजय मुंडे यांच्यासाठी त्या 'डोअर टू डोअर' फिरून नागरिकांशी संपर्क साधत आहेत.

राजश्री धनंजय मुंडे यांचा जनसंपर्क दौरा
गुरुवारी त्यांनी परळीतील विविध भागांना भेट दिली. त्यांच्या या संपर्कामुळे येणाऱ्या निवडणुकीत नणंद पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच राजश्री मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी मैदानात उतरवले असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. बीड जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय नेते मोर्चेबांधणी करत आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे तर भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे हे एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. सध्यातरी दोघेही बहीण-भाऊ निवडणुकीपूर्वीच्या तयारीला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघात फिरून महिलांशी संवाद साधत आहेत. यादरम्यान माध्यमांशी बोलताना राजश्री मुंडे म्हणाल्या की, परळी शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगले प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळी परिस्थिती असताना देखील परळीत पाणीटंचाई जाणवली नाही. जे काही महिलांचे प्रश्न असतील, ते मी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे.

Intro:परळीत पतीसाठी पत्नी 'डोअर टू डोअर'; राजश्री धनंजय मुंडे यांच्या संपर्क दौर्‍याने चर्चेला उधाण

बीड- काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय नेते मोर्चेबांधणी करत आहेत. कोणी मतदार संघात उद्घाटन कार्यक्रम घेत आहेत, तर कोणी संपर्क दौरे काढून मतदारांच्या गाठी-भेटी घेत आहेत. राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघा मध्ये ननंद पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना शह देण्यासाठी वहिनी म्हणजेच राजश्री धनंजय मुंडे जनसामान्यांमध्ये उतरल्या आहेत. पती धनंजय मुंडे यांच्यासाठी त्या 'डोअर टू डोअर' फिरून नागरिकांशी जनसंपर्क साधत आहेत. गुरुवारी त्यांनी परळीतील विविध भागाला भेट दिली. त्यांच्या या संपर्कामुळे येणाऱ्या निवडणुकीत ननंद पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच राजश्री मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी मैदानात उतरवले असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. बीड जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय नेते आखणी करत आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे तर भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे हे एक दुसर्‍याच्या विरोधात उभे राहणार आहेत. या बहिण-भावाच्या लढाईत कोण बाजी मारणार हे तर येणारा काळच सांगेल सध्यातरी दोघेही बहिण-भाऊ निवडणुकीपूर्वीच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकीपूर्वी ची तयारी याचाच एक भाग म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघात फिरून महिलांशी संवाद साधत आहेत. यादरम्यान माध्यमांशी प्रतिक्रिया देताना राजश्री मुंडे म्हणाल्या की, परळी शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगले प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळी परिस्थिती असताना देखील परळीत पाणीटंचाई जाणवलेली नाही. जे काही महिलांचे प्रश्न असतील ते प्रश्न मी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडे यांनी आपली तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केली आहे. याचाच एक भाग म्हणजे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना देखील जनसंपर्क दौऱ्यामध्ये उतरवले आहे .येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजश्री या ननंद पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना शह देणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.