ETV Bharat / state

पतीला कोरोना झाल्याचे समजताच पत्नीचा मृत्यू; धारूर तालुक्यातील गावंदरा येथील घटना - Gavandra Kusabai Bade dies

जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गावंदरा येथील रहिवासी पुरुषाचा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पतीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती पत्नीला समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. मंगळवारी घरातील लोकांनी त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला, पण त्या मृत अवस्थेत आढळल्या.

गावंदरा कुसाबाई बडे मृत्यू
गावंदरा कुसाबाई बडे मृत्यू
author img

By

Published : Aug 25, 2020, 7:53 PM IST

बीड - जिल्ह्यातील धारूर येथील शासकीय रुग्णालयात तपासणी केल्यानंतर पतीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच 57 वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गावंदरा येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गावंदरा येथील रहिवासी असलेल्या पुरुषाचा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर नियमाप्रमाणे आरोग्य विभागाने त्यांना उपचारासाठी धारूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पतीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती पत्नीला समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्या दु:खात आणि भीतीच्या छायेखाली होत्या. मंगळवारी घरातील लोकांनी त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला, पण त्या मृत अवस्थेत आढळल्या. या घटनेमुळे धारूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.