ETV Bharat / state

शिक्षकांचा मुलगा वैभव वाघमारे बनला 'आयएएस' अधिकारी - युपीएससी निकाल बातमी

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील नांदणी गावात राहणाऱ्या वैभव वाघमारे, या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेत 771 वी रँक प्राप्त करत यश संपादित केले आहे.

vaibhav vaghmare
vaibhav vaghmare
author img

By

Published : Aug 4, 2020, 7:24 PM IST

बीड - जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील नांदणी या छोट्या गावात राहणारा वैभव वाघमारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेत यश संपादन केले आहे. वैभव वाघमारेचे आई-वडील आशा वाघमारे व विकाश वाघमारे हे दोघेही शिक्षक आहेत.

वैभव विकास वाघमारे याने केंद्रीय लोकसेवा आयोग, दिल्ली यांच्या वतीने सप्टेंबर-2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत देशातून 771 रँक प्राप्त केले आहे. तालुक्यातील नांदडी हे वाघमारे यांचे मूळ गाव आहे. वैभवचे आजोबा ईश्वर वाघमारे व आजी भीमाबाई वाघमारे हे दोघेही शेतमजूर होते. स्वतः अशिक्षित असूनही त्यांनी वैभवचे वडील विकास वाघमारे यांना शिक्षक केले. विकास वाघमारे हे सध्या लातूर येथील शंभूलिंग शिवाचार्य माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. तर आशा वाघमारे (गवळी) या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. वैभवने योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मंदिर विभागातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. तर माध्यमिक शिक्षण लातूर येथून पूर्ण केले. दहावीला असताना वैभवने शंभर टक्के गुण प्राप्त केले होते. तर शाहू महाविद्यालय, लातूर येथे अकरावी ते बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बारावीला असताना वैभवने 87 टक्के गुण घेऊन मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला होता. पुढे पुणे येथे सीओईपी महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. 2018 साली लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा दिली. त्यानंतर सप्टेंबर - 2019 मध्ये केवळ दुसऱ्याच प्रयत्नात त्यांने हे यश प्राप्त केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वैभव विकास वाघमारे याने देशातून 771 वी रँक प्राप्त केली आहे. वैभव वाघमारे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.