बीड - पिंपळनेर येथे रविवारी एका १९ वर्षीय तरुणाला शेतामध्ये नेऊन त्याच्यावर तीन जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करणारे तिन्ही आरोपी फरार आहेत. अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर आरोपींनी संबंधित तरुणाचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर त्याचे फोटो काढूनही सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याचा प्रकार समोर आला आहे.
उत्तरेश्वर शिंदे, विशाल गिलबिले आणि महेश उबाळे, अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तीनही आरोपींनी त्या तरुणाला गोड बोलून शेतात नेले. सुरुवातीला बेदम मारहाण केली. त्यानंतर विवस्त्र केले व तिघांनी आळीपाळीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. आरोपींनी पीडित तरुणाचे अश्लील फोटो काढून सोशल मीडियावरही व्हायरल केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम ३७७ , ३२३ अन्वये तसेच आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पी. आय. श्रीकांत उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची माहिती देण्यासाठी थोडा वेळ लागत असल्याचे मोबाईल वरून सांगितले. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आली आहे.