ETV Bharat / state

बीड: चोरट्यांकडून विजया बँक फोडण्याचा प्रयत्न; धारुर तालुक्यातील घटना

धारूर तालुक्यातील तेलगाव येथील विजया बँक फोडण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

धारुर तालुक्यातील तेलगाव येथील घटना
धारुर तालुक्यातील तेलगाव येथील घटना
author img

By

Published : Sep 15, 2020, 4:20 PM IST

बीड - धारूर तालुक्यातील तेलगाव येथील विजया बँक फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याकडून करण्यात आला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सुदैवाने बँकेतील रोकड चोरी गेली नसल्याची माहिती पोलीसांनी दिली.

सविस्तर माहितीनुसार, धारुर तालुक्यातील तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना परिसरात विजया बँक आहे. या बँकेच्या जवळच माँ वैष्णवी देवी मंदिर आहे. या बँकेत तेलगाव कारखाना परिसर, तेलगाव, कारी आदी भागातील शेत उत्पादक शेतकर्‍यांसह अनेक व्यवसायिक व जनतेची खाती आहेत. मंगळवारी पहाटे या बँकेच्या भिंतीमधील खिडकीला लावलेली लोखंडी जाळी तोडून काचेची खिडकी फोडत अज्ञात चोरट्यांनी बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याचे सकाळी निदर्शनास आले. चोरट्यांना आतील दरवाजा तोडता न आल्यामुळे बँकेच्या तिजोरीकडे प्रवेश करता आला नाही. त्यामुळे चोरीचा डाव फसला. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दिंद्रुड पोलीस पुढील तपास करत आहेत. परंतु, सुदैवाने बँकेतील काहीही चोरी गेले नसल्याची माहिती स.पो.नि. अनिल गव्हणकर यांनी दिली.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष : आरोग्य यंत्रणेची ऑक्सिजनसाठी दमछाक; बीडमध्ये दररोज 800 सिलेंडर्सची गरज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.