बीड - गेवराई आणि परतूर तालुक्यातील दोन मावस बहिणांचा माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीत बुडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील गोदावरी नदीच्या पात्रात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. ( Two Sisters Drowned in godavari river at majalgaon )
मावशीकडे आल्या होत्या - दिपाली गंगाधर बरबडे (२० वर्षे) गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील रहिवासी होती. दुसरी स्वाती अरुण चव्हाण (१२ वर्षे) परतूर तालुक्यातील आनंदवाडी येथील रहिवासी होती. त्या दोघी नात्याने सख्या मावस बहिणी होत्या. शाळा, महाविद्यालयाला उन्हाळी सुट्या असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या तिरावर असलेल्या महातपुरी येथील त्यांच्या मावशीकडे आल्या होत्या.
तिला वाचवण्यासाठी मारली उडी - ती मावशीसह कपडे धुण्यासाठी त्या नदीवर ३ जून शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गेल्या होत्या. गंगेत अंघोळ करण्याच्या नादात स्वाती चव्हाण खोल पाण्यात पडली, ती बुडत असलेल्याचे पाहुण दिपालीने पाण्यात उडी मारली. पण दोघींनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकमेकांना मिठ्ठी मारली अन् दोघीही बुडाल्या. मावशी व इतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर काही पुरुष तेथे धाऊन आले. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण बराच काळ लोटल्या नंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले होते.
डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित - त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरने तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिंवाचे शवविच्छेदन माजलगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मण रामभाऊ शिंगाडे रा. महातपुरी, ता.माजलगाव यांच्या माहितीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोद करण्यात आली. पुढील तपास पोहेका. माणिक राठोड करत आहेत.
हेही वाचा - BJP Leader Pankaja Munde : 'माझी चिंता करू नका, मिळालेल्या संधीचं सोनं करेल'