बीड - बीड जिल्हा रुग्णालयात आज पहाटे ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यामुळे मृत्यू झाला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड म्हणाले की, अज्ञात व्यक्तीकडून ऑक्सिजन पुरवठा करणारा मुख्य कॉक बंद झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना होऊ शकला नाही. ही सत्यता आहे. असे ते म्हणाले.
हेही वाचा - ९० वर्षाच्या पैलवानाने कोरोनाला 'दोनदा' केले चितपट, म्हणाले- 'जो डर गया सो मर गया'
जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा
जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सातमध्ये पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये गेवराई तालुक्यातील काठोडा येथील संजय राठोड यांचे वडील अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यामुळे दगावल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय नायगाव तालुका पाटोदा येथील राहुल कवठेकर यांच्या मामाचा अचानक ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड म्हणाले की, ऑक्सिजन पुरवठा करणारा सिलेंडरचा कॉक अज्ञात व्यक्तीकडून बंद झाल्यामुळे पुढे ऑक्सिजन पुरवठा होऊ शकला नाही. असे असले तरी जे रुग्ण दगावले आहेत. ते अत्यंत सिरीयस होते. त्यांचा स्कोर 18 ते 20 च्या दरम्यान होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी आम्ही करणार आहोत.
जिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभार
बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर चांगले उपचार होत नाहीत. आम्ही आमच्या रक्ताचे नाते रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे गमावले आहेत, असा आरोप ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक संजय राठोड व राहुल कोठेकर यांनी केला.
हेही वाचा - आम्ही काय पाकव्याप्त काश्मिरात राहतो का? रेमडेसिवीरवरून सुरेश धस संतप्त