बीड: घराच्या शेजारी पडलेल्या जिवंत विद्यूत तारेला चिकटून दोन लेकरांसह आईचा जागीच मृत्यू two children and mother electric shock death झाल्याची घटना Beed Electric Shock Death घडली. गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यावर शनिवारी दुपारी बारा वाजता घडली. children and mother died Gevrai Beed गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला या घडलेल्या घटनेमुळे शोककळा पसरली होती.
गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला गावात शोककळा - गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी तांडा येथील महिला ललिता श्रीकांत राठोड ( वय ३० वर्षे ) त्यांचा मुलगा अभिजित श्रीकांत राठोड ( वय ८ वर्षे ) आणि प्रशांत श्रीकांत राठोड (वय ११ वर्षे ) अशा तिघांचा राहत्या घराजवळील विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी तत्काळ भेंडटाकळी तांड्यावर जाऊन राठोड परिवाराचे सांत्वन केले. याप्रकरणी सायंकाळपर्यंत तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
वेगवेगळ्या घटनेत पाच जणांचा मृत्यू - दरम्यान,बीड तालुक्यातील चौसाळा येथे गिझरचा शॉक बसून तारेक अजीज कुरेशी या तरुणाचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत नळाचे पाणी भरताना पाण्याच्या मोटारचा शॉक लागून प्राजक्ता किशन गायकवाड (१८) या तरुणीचा अंबाजोगाईत मृत्यू झाला.