ETV Bharat / state

व्यापाऱ्यांना मारहाण भोवली, 2 पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी - बीड पोलीस न्यूज

लॉकडाऊन शिथील असताना देखील व्यापाऱ्यांना दुकानात घुसून मारहाण केल्याप्रकरणी बीड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक व वाहतूक शाखेचे प्रमुख यांची औरंगाबाद येथे उचलबांगडी करण्यात आली आहे.

two beed police officers  transferred in aurangaba for merchants beaten
2 पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी
author img

By

Published : May 17, 2020, 8:45 PM IST

बीड - लॉकडाऊन शिथिल असताना देखील व्यापाऱ्यांना दुकानात घुसून मारहाण केल्याप्रकरणी बीड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक व वाहतूक शाखेचे प्रमुख यांची औरंगाबाद येथे उचलबांगडी करण्यात आली आहे. 2 दिवसापूर्वी एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी बंद पुकारत आक्रमक पवित्रा घेतला होता. मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची औरंगाबाद येथे उचलबांगडी झाल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने व्यापाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

बीड शहरचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे व वाहतूक शाखेचे राजीव तळेकर यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाची आमदार संदीप क्षीरसागर यांनी दखल घेतली व राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे हे प्रकरण लावून धरले. परिणामी जिल्हा पोलीस प्रशासनाला मोरे व तळेकर यांची तडकाफडकी बदली करावी लागली. व्यापाऱ्यांची भावना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाचे घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी बांधवानी आभार मानले.

असे घडले होते प्रकरण
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बीडमध्ये व्यापार्‍यांना आपली दुकाने उघडलेली होती. यावेळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.वासुदेव मोरे व इतर पोलीस कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची खातरजमा न करता व्यापार्‍यांना व ग्रााहकांना मारहाण करून जबरदस्तीने बीड शहर पोलीस ठाण्यात नेले होते. यानंतर बीड शहरातील व्यापारी बांधवांनी आक्रमक भूमिका घेत विनाकारण त्रास देणार्‍या पो. नि. वासुदेव मोरे ,वाहतूक शाखेचे पो. नि तळेकर यांना निलंबित करावे, अशी मागणी करून बेमुदत बंदची हाक दिली होती. अतिरिक्त पदभार वाहतूक शाखा पो. नि. पाटील, (पेठ बीड पोलीस ठाणे व बीड शहर) पो. नि. सुनील बिर्ला यांच्याकडे पोलीस ठाणे शिवाजीनगरची जबाबदारी देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.