सिरसाळा (बीड) - घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका 45 वर्षीय विवाहित महिलेवर एका नराधमानाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. सिरसाळा परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी फरार आरोपीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
लहू लिंबाजी घडवे असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला घरी एकटीच होती. याचा गैरफायदा घेत आरोपीने बळजबरी करुन हे कृत्य केले. तसेच ही घटना कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची आणि गावात राहू न देण्याची धमकी दिली. पीडितेने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. आरोपीविरोधात कलम 376, 507 भांदवीनुसार सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. याप्रकरणाचा तपास महिला अत्याचार आयोगाच्या सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.