ETV Bharat / state

शेत तळ्यात बुडून बाप-लेकासह एकाचा मृत्यू; गेवराई तालुक्यातील दैठणा येथील घटना - Aditya Patil drowned Daithana

शेततळ्यात बुडून बाप-लेकासह अन्य एका जणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील दैठण येथे आज सायंकाळी घडली. सुनिल जग्गनाथ पंडित (वय 40) त्यांचा मुलगा राज पंडित (वय 12) व आदित्य पाटील (वय 10 रा. शेवगाव) असे शेततळ्यात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Sunil Pandit drowned Daithana
सुनिल पंडित बुडून मृत्यू दैठणा
author img

By

Published : Jun 10, 2021, 10:09 PM IST

बीड - शेततळ्यात बुडून बाप-लेकासह अन्य एका जणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील दैठण येथे आज सायंकाळी घडली. सुनिल जग्गनाथ पंडित (वय 40) त्यांचा मुलगा राज पंडित (वय 12) व आदित्य पाटील (वय 10 रा. शेवगाव) असे शेततळ्यात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - बीडच्या गेवराईत शेतीच्या वादातून दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई येथे सुनील पंडित यांचा चारचाकी वाहन खरेदी विक्रीसह फायनान्सचा व्यवसाय आहे. ते मागील काही वर्षांपासून शहरातच वास्तव्यास आहेत. दरम्यान पंडित हे आज दुपारी मुलगा राज व पत्नीचा भाचा आदित्य या दोघांना घेऊन त्यांच्या दैठण येथील शेतात गेले होते. यानंतर ते शेतातील शेततळ्यावर गेले होते. यावेळी राज आणि सुनील यांचा भाचा आदित्य पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले असता ते दोघे पाण्यात बुडू लागले. हे पाहून सुनील पंडित यांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. त्यांनी दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, शेततळ्याच्या अस्तरीकरणावरून पाय घसरत असल्याने त्यांना वरती येता आले नाही. तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर तिघांचेही मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने शेततळ्याबाहेर काढून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण दैठणसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - परळी - अंबाजोगाई रस्त्यावरील पूल वाहून गेला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.