ETV Bharat / state

बीड-परळीत हजारो भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन - Thousands of devotees visit Bhagwan Shiva

बीड जिल्ह्यात हर हर महादेवचा गजरात जिल्ह्यातील शिवालय भाविकांनी गजबजली आहेत. महाशिवरात्रि निमित्त बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Thousands of devotees visit Bhagwan Shiva in Beed district
बीड-परळीत हजारो भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन
author img

By

Published : Feb 21, 2020, 12:49 PM IST

बीड - हर हर महादेवचा गजर करत बीड जिल्ह्यातील शिवालये भाविकांनी गजबजून गेली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच भाविकांनी रीघ लावली होती. बीड शहरातील कंकालेश्वर मंदिरात विविध अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. बीडमध्ये भाविकांनी सहकुटुंब कन्कलेश्वराचे दर्शन घेतले.

बीड-परळीत हजारो भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन

बीड जिल्हा ही संतांची भूमी आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तिभावाने महाशिवरात्र उत्सव साजरा करतात ग्रामीण भागांमध्ये ठिकठिकाणी पारायणे करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक आले होते. शुक्रवारी पहाटेपासूनच दर्शन रांगा पाहायला मिळाल्या, परळी येथील वैद्यनाथाची पूजा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता केली.

बीडचा कंकालेश्वर मंदिराचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा -

बीड शहराच्या इतिहासात गौरवाचे स्थान असलेल्या कंकालेश्वर मंदिराचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे कंकालेश्वर मंदिराचे पुजारी संजय महाराज गिरी यांनी सांगितले. विशेष म्हणजे कंकालेश्‍वर मंदिर हे पाण्याच्या कुंडात बांधलेले आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने कंकालेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी बीड जिल्ह्यातील शिवमंदी भवती कडक पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.