ETV Bharat / state

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, कर्ज फेडीसाठी बॅंकेने कधीच नोटीस पाठवली नाही

author img

By

Published : Feb 15, 2021, 5:29 PM IST

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ आणखी वाढतच चालले आहे. पुजाने बॅंकेकडून कर्ज घेतले होते त्यामुळे ती तणावात होती, त्यातून तिने आत्महत्या केली असावी असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. परंतु बँकेकडून एकही नोटीस पुजाच्या कुटुंबीयांना आली नसल्याचे समोर आले आहे.

पुजा चव्हाण
पुजा चव्हाण

बीड- पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ आणखी वाढतच चालले आहे. पुजाने बॅंकेकडून कर्ज घेतले होते त्यामुळे ती तणावात होती, त्यातून तिने आत्महत्या केली असावी असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. परंतु बँकेकडून एकही नोटीस पुजाच्या कुटुंबीयांना आली नाही. पुजा चव्हाण व तिच्या कुटुंबीयांनी 2018 मध्ये कुक्कुट पालनासाठी 13 लाख 50 हजारांचे एसबीआय बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र बॅंकेने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला नसल्याचे समोर येत आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पुजा व तिचे कुटुंबीय कुक्कुट पालनाचा व्यावसाय करतात, 2018 मध्ये पुजा चव्हाण हिने एसबीआय बँकेकडून तेरा लाख पन्नास हजारांचे कर्ज घेतले होते. या पैशातूनच कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र नऊ महिन्यांपूर्वी अचानक कोरोनाचे संकट आले. कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला, लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार बंद असल्यामुळे बँकेचे हप्ते भरले गेले नाहीत, मात्र असे असताना देखील बँकेकडून कसलीच नोटीस तीच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आली नसल्याचे बॅंक कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढले

पुजा चव्हाण हिच्या वडिलांनी रविवारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, आमच्याकडे बँकेचे कर्ज आहे. बँकेच्या कर्जामुळे पुजा तणावाखाली होती. प्रत्येक महिन्याला 55 हजार बॅंकेत जमा करावे लागतात, हे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पुजाला पडला होता. मात्र प्रत्यक्षात तिच्या कुटुंबीयांना केवळ बॅंकत 35 हजारच जमा करावे लागत होते. लॉकडाऊनच्या काळात तर एकही हप्त भरला नव्हता, तरीदेखील त्यांना बँकेकडून कर्ज भरण्याची नोटीस आली नसल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत भरले आहेत बॅंकेचे 12 हप्ते

2018 मध्ये पुजाने एसबीआय बँकेकडून 13 लाख 50 हजारांचे कर्ज घेतले होते. तिच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत कर्जाचे 12 हप्ते भरले होते. तिला घेतलेल्या कर्जावर बॅंककडून 2 लाख 70 हजारांची सबसिडी देखील मिळाली होती. या कर्जासाठी पुजाच्या कुटुंबीयांनी एक एकर जमीन आणि वसंत नगर तांडा येथील राहते घर बॅंकेकडे तारण ठेवले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.