ETV Bharat / state

कोचिंग क्लास सुरू करायला परवानगी द्या, शिक्षक संघटनांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

author img

By

Published : Nov 2, 2020, 4:13 PM IST

खासगी क्लासेस अद्याप बंद आहेत. याबाबत प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष विजय पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना खासगी क्लासेस सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. खासगी शिकवण्या बंद आहेत. त्या सुरू करण्याची शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

BEED COACHING CLASSES REOPEN
कोचिंग क्लास सुरू करायला परवानगी द्या

बीड - राज्यभरात आता हळूहळू इतर व्यवसाय सुरू केले जात आहेत. मात्र खासगी क्लासेस अद्यापही बंद आहेत. याबाबत प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष विजय पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना खासगी क्लासेस सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. खासगी शिकवण्या बंद आहेत. त्या सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत विद्यार्थ्यांना काय वाटते तसेच कोचिंग क्लासेस चालक यांचे काय म्हणणे आहे. याबाबत ईटीव्ही भारत ने घेतलेला हा आढावा.
शासनाने खासगी कोचिंग क्लासेस देखील तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी विजय पवार यांनी सोमवारी केली आहे. प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनअंतर्गत राज्यभरात 50 हजार शिक्षक काम करतात. मात्र मागील आठ महिन्यांपासून खासगी कोचिंग क्लासेस बंद असल्याने पन्नास हजार खासगी शिक्षकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे खासगी कोचिंग क्लासेस चालक शासनाला जीएसटी भरतात, त्यामुळे शासनाचे देखील उत्पन्न बुडत आहे. शासनाने तात्काळ खासगी कोचिंग क्लासेस सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

कोचिंग क्लास सुरू करायला परवानगी द्या
जिल्हाधिकाऱ्यांना दिले तीनवेळा निवेदन
मागील दोन महिन्यांमध्ये प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना तीन वेळा निवेदन दिले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खासगी कोचिंग क्लासेस सुरू करताना जे नियम आम्हाला घालून दिले जातील, ते काटेकोरपणे पाळून आम्ही कोचिंग क्लासेस सुरू करू, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.