ETV Bharat / state

यापुढे नियम मोडल्यास आमच्यावर कारवाई करा -वरून सरदेसाई - युवासेना औरंगाबाद

युवासेनेच्या कार्यक्रमात गर्दी झाली. मात्र, ही गर्दी अपेक्षित नव्हती. कार्यकर्त्यांना उत्साहामुळे गर्दी झाली. परंतु, यामध्ये कोणी दोषी असेल तर आमच्यासह कार्यकर्त्यांवर प्रशासनाने कारवाई करणे योग्य राहील असे स्पष्टीकरण युवासेना सचिव वरुन सरदेसाई यांनी दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

युवासेना सचिव वरून सरदेसाई यांची पत्रकार परिषदेत

author img

By

Published : Aug 13, 2021, 5:13 PM IST

औरंगाबाद - बीडमध्ये युवासेनेच्या कार्यक्रमात गर्दी झाली. मात्र, ही गर्दी अपेक्षित नव्हती. कार्यकर्त्यांना उत्साहामुळे गर्दी झाली. परंतु, यामध्ये कोणी दोषी असेल तर आमच्यासह कार्यकर्त्यांवर प्रशासनाने कारवाई करणे योग्य राहील असे स्पष्टीकरण युवासेना सचिव वरुन सरदेसाई यांनी दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

युवासेना सचिव वरून सरदेसाई यांची पत्रकार परिषदेत

'जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी मेळावे नाही'

राज्यात युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत असताना योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र, काही ठिकाणी गर्दी होत आहे. मात्र, माध्यमांवर टीका केली जात आहे. याबाबत वरिष्ठ नेते आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. यापुढे आम्ही काजळी घेऊ. कुठेही गर्दी न करता फक्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येतील. यापुढे जिथे रुग्ण जास्त आहे, तिथे मेळावे घेणार नाही हा संवाद मेळावा आहे. आमचे चुकले, जर प्रशासनाने कारवाई केली तर आम्हाला ती मान्य आहे. असही वरुण सरदेसाई यावेळी म्हणाले आहेत.

'ते निर्णय घेतील'

ठाकरे घरण्यातून आता तेजस ठाकरे राजकारणात येणार अस बोलले जाते आहे. त्यावर बोलताना याबाबत मी जास्त बोलू शकणार नाही, ते उत्तम वन्यजीव छायाचित्रकार आहेत. त्यांनी चांगल्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांचे काम चांगले आहे. ते स्वतः निर्णय घेतील अशी सावध प्रतिक्रिया वरून सरदेसाई यांनी दिली आहे. तर, औरंगाबादच्या नामांतराबाबत बोलताना वरिष्ठ याबाबत बोलतील असे म्हणत त्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.