बीड - अंबाजोगाई येथील रूद्रवार दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू झाला त्यांचा सोबत त्यांची चार वर्षाची मुलगी विहा अमेरिकेत राहात होती. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा करून मुलीचा ताबा अंबाजोगाई येथील रुद्रवार कुटुंबाकडे दिला आहे.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''महाराष्ट्रातील अंबाजोगाई येथील रुद्रवार दांम्पत्याचा न्यू जर्सी, अमेरिका येथे संशयास्पद मृत्यु झाल्यानंतर तेथील न्यायालयाने त्यांच्या ४ वर्षांच्या लहान मुलीचा ताबा भारतातील रुद्रवार कुटुंबियांकडे दिला.परक्या मुलूखात माता-पित्याचे छत्र हरविलेल्या या मुलीला पुन्हा मायेचे छत्र मिळाले.''
याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून ही घटना घडल्यानंतर एका आठवड्याच्या आत या छोट्या मुलीला रुद्रवार कुटुंबियांकडे सोपविण्यासाठीचे सोपस्कार तातडीने पूर्ण केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरजी, परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानल्याची पोस्ट सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.
हेही वाचा - रशियामध्ये इंदापूरच्या तरुणाचे निधन; खासदार सुळे यांच्या प्रयत्नामुळे पार्थिव भारतात दाखल