ETV Bharat / state

Beed Murder Case: ऊसतोड मजुराचा डोक्यात दगड घालून खून; घटनास्थळी पोलीस दाखल - Sugarcane Worker

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा (बु) येथे धक्कादायक घटना घडली आहे. 40 वर्षीय ऊसतोड मजुराच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी उशिरा उघडकीस आली आहे. महादेव गुरुबा काळुंके ( वय 40, रा. धानोरा बु, ता. अंबाजोगाई, बीड) असे खून झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे.

Beed Murder Case
डोक्यात दगड घालून खून
author img

By

Published : Jun 17, 2023, 6:12 PM IST

बीड : अगदी राहत्या घरापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. महादेवचा चुलत भाऊ रात्री दीड वाजताच्या दरम्यान प्रात विधीसाठी जात असताना, महादेव हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसला. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. ही घटना त्याने घरच्यांना सांगितली. महादेवचा एक कान देखील तुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

खुनाच्या घटनांमध्ये वाढ : बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून आपापसातील वादामुळे खुनाच्या व वादविवाद या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज बीड जिल्ह्यामध्ये अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. जिल्ह्यात अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीतून वाद निर्माण होतात. तसेच हे व्यसनी तरुण एकमेकांचा खून करायला भीत नाहीत. असाच हा प्रकार घडला असावा असा अंदाज, पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

ऊसतोड मजूराचा खून : घटनेची माहिती समाजातच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पहाटे 3.00 वाजताच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले हेही उपस्थित होते. यावेळी मृतदेह हा अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. घटना कोणत्या कारणामुळे घडली हे तपासात समोर येणार आहे. महादेव काळुंके हा ऊसतोड मजूर होता. घरातील कर्ता असल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. चार वर्षांपूर्वी त्याच्या मोठ्या मुलाचे लग्न झालेले आहे. तर एक 13 वर्षाची मुलगी 9 वर्षाचा मुलगा, पत्नी असा परिवार आहे.

अशीच एक घटना : बीड येथील अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडीमध्ये तीक्ष्ण हत्याराने वार करून सासऱ्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा तीन दिवसांवर आलेला असताना ही घटना घडली होती. केंद्रेवाडी येथे तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आला होती. दत्ता गायके (वय 58) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव होते. 20 पेक्षा अधिक वार करत निर्घृण खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होती. तर घटनास्थळी जावयाची मोटारसायकल आढळल्याने जावयानेच खून केल्याचा अंदाज केला होता. रामेश्वर गोरे असे जावयाचे नाव होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.