ETV Bharat / state

Law Against Bogus Seeds Selling: बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा करणार - धनंजय मुंडे - बोगस बियाणे विक्रीविरुद्ध कायदा

बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यां विरोधात कडक कायदा करणार असल्याचा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पावसाळी अधिवेशनात दिला आहे. या अंतर्गत बोगस विक्री करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. याच अधिवेशनात कायदा लागू करणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

Law Against Bogus Seeds Selling
धनंजय मुंडे
author img

By

Published : Jul 17, 2023, 10:50 PM IST

बीड/मुंबई : राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे. मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधात अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

कायद्यासाठी विशेष समिती स्थापन करणार : बीटी-कापूस बियाण्यांच्या बाबतीत बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. त्याच धर्तीवर तोच कायदा अन्य बियाण्यांच्या, खतांच्या व कीटक नाशकांच्या बाबतीतही लागू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कायद्याचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू: हा कायदा अस्तित्वात आणण्यासाठीचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू आहे. समितीचा निर्णय होताच, चालू पावसाळी अधिवेशनातच हा कायदा लागू करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

बोगस बियाणे विक्रीवरून जयंत पाटलांचा प्रश्न: लोकसभा निवडणूक पूर्व तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागील महिन्यात गडचिरोली, रामटेक, वर्धा तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. बैठकीला मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थिती होते. बोगस बियाणे शोधणाऱ्या पथकात खासगी व्यक्तींचा समावेश म्हणजे बोगस बियाणे विकायचे असेल तर विका, पण आमचा वाटा द्यावा असे मंत्र्यानीच केले का? मंत्र्यांनी एजंट नेमले की काय, असा प्रश्न बोगस बियाण विक्री प्रकारणावरून जयंत पाटील यांनी सरकाला विचारला आहे.

हेही वाचा:

  1. वाशिममध्ये 5 लाख 90 हजारांचे बोगस बियाणे जप्त, दुकानदार फरार
  2. बोगस बियाणांच्या वाहतूक व पुरवठ्यावर आळा घालून संबंधितांवर कडक कारवाई करा - पालकमंत्री भुमरे
  3. कोणत्याही स्थितीत बोगस बियाणांचे वाटप होता कामा नये - जिल्हाधिकारी येडगे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.