ETV Bharat / state

कामगार व विद्यार्थ्यांना पासची मुदत वाढवून द्यावी; संभाजी ब्रिगेडची एसटी महामंडळाकडे मागणी - बीड संभाजी ब्रिगेड न्यूज

लॉकडाऊन कालावधीत ज्या प्रवासी पासची मुदत संपली ती वाढवून द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वायकर यांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकाकडे केली. याबाबत वायकर यांनी एक निवेदन दिले आहे.

Statement
निवेदन
author img

By

Published : Jun 10, 2020, 9:16 PM IST

बीड - जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आणि कामगारांनी कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी एसटी महामंडळाचे मासिक व त्रैमासिक पास काढले होते. मात्र, 22 मार्चनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले व एसटी सेवा बंद केली. या दरम्यान पासची मुदतही संपून गेली. लॉकडाऊन कालावधीत ज्या प्रवासी पासची मुदत संपली ती वाढवून द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वायकर यांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकाकडे केली. याबाबत वायकर यांनी एक निवेदन दिले आहे.

कामगार व विद्यार्थ्यांना पासची मुदत वाढवून द्यावी

सध्या लॉकडाऊन शिथील झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात बस सेवा देखील सुरू झाली आहे. त्यामुळे महामंडळाने पासधारकांना मुदत वाढवून द्यावी. एकट्या बीड जिल्ह्यातच पासधारक कामगार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या 25 हजारांपेक्षा जास्त आहे. महामंडळाने पासची मुदत वाढवून दिल्यास या सर्वांना फायदा होईल, असे या निवेदनात म्हटले आहे. याबाबत येत्या आठ दिवसांमध्ये एसटी महामंडळाने निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.