ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी; सोयाबीनसह इतर पिके पाण्यात, शेतकऱ्यांची पंचनाम्याची मागणी - heavy rain beed

जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा दीड लाख हेक्टरवरती झालेला आहे. पीक बहारदार आल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत होते. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे होत्याचे नव्हते झाले.

बीड अतिवृष्टी
बीड अतिवृष्टी
author img

By

Published : Sep 19, 2020, 5:41 PM IST

बीड- कायम दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झालेली आहे. मागील ४ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, कापूस व कापसाची पिके पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोरोनाच्या महामारीमध्ये आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा अस्मानी संकटामुळे मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यात काल (१८ स्पटेंबर) मध्यरात्री झालेल्या धुवाधार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, उडीद पिकाचे अतोनात नुकसान झाले. तर, कापसाला पाणी लागल्याने तो पिवळा पडू लागला आहे. यामुळे कापसाचे देखील पीक गेल्यात जमा आहे. जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची जमीन देखील खरडून वाहून गेली आहे.

माहिती देताना शेतकरी सचिन कोठुळे व राहुल वाईकर

जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा दीड लाख हेक्टरवरती झालेला आहे. पीक देखील बहारदार आल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत होते. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे होत्याचे नव्हते झाले. यातच वादळी वारा आल्याने उसाचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने सोयबीन पीक धोक्यात आले आहे. पिकांमधून पाणी वाहत असतानाचे चित्र बीड तालुक्यातील चौसाळा नेकनूर मांजरसुंबा शिवारात दिसत आहे. सोयाबीन बाजरी काढून टाकण्यात आली आहे. मात्र, पिक पाण्यात आल्याने नुकसान झाल्याचे शेतकरी सचिन कोठुळे यांनी सांगितले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल वाईकर यांनी केली.

हेही वाचा- बीड जिल्ह्याला दिवसाला किती लागतोय ऑक्सिजन? कशी वाढली मागणी?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.