ETV Bharat / state

परळीत 15 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या पोलिसांच्या बदल्या करा; मुंडेची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Social activist Vasant Munde

विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करू देऊ नये, असेही निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत वसंत मुंडे यांनी म्हटले आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Sep 27, 2019, 11:36 PM IST

बीड - जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी थेट बहिण विरुद्ध भाऊ लढत होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका शांततेत व पारदर्शक पार करायच्या असतील तर परळी येथे मागील 15 वर्षांपासून ठाण मांडून बसलेला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

परळीमधील पोलिसांबाबत भाष्य करताना सामाजित कार्यकर्ते वसंत मुंडे

हेही वाचा - दोन मंत्र्यांच्या संघर्षात बीडचे जिल्हाधिकारी १५ दिवसांच्या रजेवर, धनंजय मुडेंचा पंकजा अन् क्षीरसागर यांना टोला

परळी शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. येणार्‍या निवडणुकीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्या पोलीस कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करू देऊ नये, असेही निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत वसंत मुंडे यांनी म्हटले आहे. या निवेदनाची दखल घेऊन निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:15 वर्षापासून परळीत ठाण मांडून बसलेल्या पोलिसांच्या बदल्या करा; निवडणूक आयोगाकडे तक्रार

बीड- जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदार संघात बहिण विरुद्ध भाऊ अशी लढत होणार आहे. विधानसभा निवडणुका शांततेत व पारदर्शक पार करायच्या असतील तर परळी येथे परळी येथे मागील पंधरा वर्षापासून ठाण मांडून बसलेला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा अन्यथा शांततेत निवडणुका होणे शक्य नाही असे सांगत थेट निवडणूक आयोगाकडे परळी येथील सामाजीक कार्यकर्ते वसंत मुंडे यांनी तक्रार केली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी थेट लढत होणार आहे. यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये असे वाटत असेल तर परळी येथे पंधरा-पंधरा वर्ष ठाण मांडून बसलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात असे निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाला समाजिक कार्यकर्ते वसंत मुंडे यांनी कळवले आहे. एवढेच नाही तर पोलिसांच्या आशीर्वादाने परळी शहरात अवैध धंदे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ामुळे येणार्‍या निवडणुकीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. असे निवडणूक आयोगाला दिलेल्या तक्रारीत वसंत मुंडे यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये जुना पोलीस कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करू देऊ नये, असेही निवेदनात मुंडे यांनी म्हटले आहे. या निवेदना ची दखल घेऊन निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.