ETV Bharat / state

बीडमध्ये कर्ज घेऊन उभारलेल्या छोट्या उद्योजकांना घरघर; बँकेचे हप्ते भरण्याचा प्रश्न

author img

By

Published : Jun 26, 2020, 8:01 AM IST

लॉकडाऊनमुळे दोन-तीन महिने उद्योगधंदे बंद राहिल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. बीड जिल्ह्यात अनेक व्यावसायिकांनी कर्ज घेऊन उद्योग सुरू केले होते. मात्र, अचानक लागलेल्या लॉकडाऊनमुळे या व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

small entrepreneurs in Beed
बीडमध्ये कर्ज घेऊन उभारलेल्या छोट्या उद्योजकांना घरघ

बीड- कोरोनाचे संकट येण्यापूर्वी उद्योग धंदे सुरळीत सुरू होते. मात्र, लॉकडाऊनमुळे दोन-तीन महिने उद्योगधंदे बंद राहिल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. बीड जिल्ह्यातदेखील हीच परिस्थिती आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन उद्योग सुरू केला. कर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचे पाच-सहा महिने कर्जाचे हप्ते सुरळीत भरले. मात्र, मार्चनंतर सगळी परिस्थिती पालटली. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. उद्योग-धंदे तब्बल तीन महिने बंद राहिले. यामुळे जिल्ह्यात नव उद्योजकांनी घेतलेली गती मंदावली. आता लॉकडाऊन शिथील झाले आहे. मात्र, बाजारात आर्थिक उलाढाल म्हणावी तशी होत नाही. याचाच परिणाम म्हणून आता बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी देखील मारामार असल्याचे बीड जिल्ह्यातील नव उद्योजकांनी सांगितले.

बीडमध्ये कर्ज घेऊन उभारलेल्या छोट्या उद्योजकांना घरघर

केवळ उद्योगावर हप्ते भरणे झालयं अशक्य-

शहरात रंग विक्रीचा व्यवसाय करणारे योगेश वाघिरे यांनी कोरोनाचे संकट येण्यापूर्वी १५ लाख रुपयांची गुंतवणूक करून रंग विक्रीचे दुकान सुरू केले. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज घेतले. दुकान चांगल्या प्रकारे सुरू झाले. मात्र, कोरोनाच्या संकटानंतर बाजारपेठेत आर्थिक मंदी ओढावली. लॉकडाऊनमुळे तीन महिने दुकान बंद राहिले मात्र, बँकेचे हप्ते भरावेच लागणार आहेत. त्यामुळे आमच्यासारखे नवीन उद्योजक मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. लॉकडाऊन शिथिल होऊनही म्हणावी तशी बाजारपेठ फुलली नाही, असे उद्योजक योगेश वाघिरे म्हणाले.

लॉकडाऊननंतर पुन्हा नव्याने उद्योगांमध्ये गती घेण्याचे मोठे आव्हान नवउद्योजकांना समोर उभे राहिले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत बीड जिल्ह्यात ९०० हून अधिक तरुणांनी कोरोनापूर्वी आठ दहा लाखांच्या भांडवलात अनेक उद्योग सुरू केलेले आहेत. लॉकडाऊनपूर्वी व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने सुरू होते. मात्र, अचानक लॉकडाऊन जाहीर झाले व उद्योग-व्यवसायात घेतलेली गती मोठ्या प्रमाणात मंदावली. बीड येथील फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे सचिन नलावडे यांनी लॉकडाऊन पूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळअंतर्गत सहा लाखाचे कर्ज घेऊन फोटोग्राफी व्यवसायासाठी लागणारे महागडे कॅमेरे विकत घेतले. मात्र, लॉकडाऊनमुळे फोटोग्राफीचा व्यवसाय थांबला. आता बँकेचे कर्ज भरायचे कसे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला असल्याचे नलावडे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.