बीड - 'मला जिल्हाधिकारी, बीड यांचा आदेश माहित नाही ' तुम्ही दुकाने बंद करा, असे म्हणतात बीडमध्ये चक्क व्यापाऱ्यांना दमदाटी करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याविरोधात बीड जिल्ह्यातील व्यापारी संघटना आक्रमक झाली असून दुकाने उघडू द्यायची नसतील तर संचारबंदी शिथिलच का करता ? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी बीड जिल्हा व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा... दुष्काळग्रस्त खटाव आणि माण तालुक्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण; परिसरात चिंतेचे वातावरण
बीड जिल्ह्यात बुधवारपासून सकाळी 7 ते 2 या वेळेत संचारबंदी शिथिल करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार बुधवारी बीड शहरातील व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी व छोट्या-मोठ्या फळ विक्रेत्यांनी आपला माल विक्री सुरू केला. मात्र, पोलिसांनी त्या व्यापाऱ्यांना मारहाण करत शेतकऱ्यांचा माल चक्क नगरपालिकेच्या घंटागाडीत फेकून दिला. या घटनेनंतर व्यापारी संघटना आक्रमक झाले. असून आम्ही चोर नाहीत व्यापारी आहोत, असे म्हणतात संबंधित मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी केली आहे. याबाबत बुधवारी दुपारनंतर व्यापारी संघटनेची बैठक होणार असल्याचेही व्यापारी संघटनेचे जीवन जोगदंड यांनी सांगितले.