ETV Bharat / state

आम्ही भाजपला मदत का करायची, बीडमधील शिवसैनिकांचा संपर्क प्रमुखांना प्रश्न - बीड

शिवसेनेचे बीड लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी शनिवारी बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपविषयीची नाराजी त्यांना बोलून दाखवली.

शिवसेनेचे बीड लोसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख आनंद जाधव
author img

By

Published : Mar 17, 2019, 11:06 AM IST

बीड - राज्यात युतीचे सरकार असतानाही भाजपच्या नेत्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. पाच वर्षात ढुंकुनही पाहिले नाही. आता निवडणुका आल्यावर त्यांना शिवसैनिकांची आठवण आली आहे. आम्ही भाजपला मदत का करायची, असा प्रश्न बीडमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बीड लोकसभा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांना विचारला. यामुळे जाधव निरुत्तर झाले. या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यात दिलजमाई अद्याप झाली नाही हे समोर आले आहे.

शिवसेनेचे बीड लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी शनिवारी बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपविषयीची नाराजी त्यांना बोलून दाखवली. भाजपकडून चारा छावणीच्या बाबतीतही आमच्यावर अन्याय झाला. तेव्हा भाजला मदत कशी करायची असा प्रश्न शिवसैनिकांनी विचारला. यामुळे संपर्क प्रमुख जाधव यांना काय उत्तर द्यावे हे क्षणभर समजले नाही.

भाजप आणि शिवसेनेने राज्यस्तरावर युती केली आहे. पण, पक्ष नेतृत्वाने केलेली ही युती अजूनही कार्यकर्त्यांच्या गळी उतरली नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. दोन्ही पक्षातील धुसफूस निवडणुकीच्या निमीत्ताने बाहेर येत आहे. ज्या पक्षाला आपण कालपर्यंत विरोध केला, त्यांनाच मदत कशी करायची असा प्रश्न कार्यकर्ते नेतृत्वाला विचारू लागली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र काम करायला लावण्याचे मोठे आव्हान या पक्षांपुढे आहे.

बीडमध्ये विनायक मेटे यांनी भाजपला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

Intro:खालील बातमी चा फोटो डेस्क च्या व्हाट्सएप ग्रुप वर सेंड केला आहे.....
***************
शिवसेनेच्या संपर्कप्रमुखासमोर स्थानिक च्या शिवसैनिकांनी मांडली कैफियत; म्हणाले, पाच वर्षात आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही

बीड- शिवसेनेचे बीड लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी शनिवारी बीड जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा दौरा केला. यावेळी शिवसैनिकांनी भाजप बद्दल नाराजीची कैफियत आनंद जाधव यांच्यासमोर मांडली. शिवसैनिक म्हणाले की, सत्तेच्या पाच वर्षात बीडच्या भाजपमधील नेत्यांनी आमच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मग आताच भाजप ला आमची आठवण कशी आली? असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थित केला केला आहे. शिवसेना व भाजप यांची राज्यस्तरावर पक्षश्रेष्ठींनी केली असली तरी मात्र स्थानिक पातळीवर भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा कायम असल्याचे वास्तव पाहायला मिळते बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे शिवसैनिकांची मनधरणी कशी करणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Body:बीड लोकसभा मतदार संघातुन युतीच्या उमेदवार म्हणून डॉ. प्रीतम मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप व शिवसेनेची झालेली आहे. नेत्यांनी राज्यस्तरावर जरी युती केली तरी स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तू - तू मै - मै होत असल्याचा प्रत्यय शनिवारी आला. शिवसेनेचे बीड लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आनंद जाधव बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी परळी, माजलगाव, धारूर वडवणी, अंबाजोगाई व केज तालुक्यात ठिकाणी भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. यादरम्यान स्थानिक शिवसैनिकांनी आनंद जाधव यांच्यासमोर कैफियत मांडली. यावेळी शिवसैनिक म्हणाले की, पाच वर्ष भाजप व त्यांचे नेते यांनी आमच्याकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही. एवढेच नाही तर चारा छावणी मंजुरीत देखील शिवसैनिकावर भाजपकडून अन्याय झालेला आहे. अशा परिस्थितीत आम्ही भाजपला मदत का करायची? असा प्रतिप्रश्न बीड जिल्ह्यातील स्थानिक शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांना विचारल्याने ते क्षणभर गोंधळात पडले होते.

Conclusion:बीड लोकसभा मतदारसंघात भाजपला पुन्हा एकदा निवडून यायचे असेल तर मित्रपक्ष यांना बरोबर घेऊन बीड भाजप ला प्रचाराला लागावे लागणार आहे. अगोदरच आमदार विनायक मेटे यांनी राज्यभरात जरी भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असली तरी बीडमध्ये मात्र आमदार मेटे यांनी पंकजा मुंडेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे मंत्री पंकजा मुंडे व डॉक्टर प्रीतम मुंडे यांना मित्र पक्षांना बरोबर घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार. आता एकंदरीत या उद्भवलेल्या परिस्थितीवर मंत्री पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे कशी मात करतात हे पाहण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. दिवसेंदिवस लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी वेग घेत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.