ETV Bharat / state

बीडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखाला कार्यकर्त्यांकडूनच शिवीगाळ; प्रचारादरम्यान घडला प्रकार - chousala

बीड लोकसभा मतदार संघात शिवसेना व भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे मंगळवारी चौसाळा येथे एका छावणीवर प्रचारासाठी गेले होते.

बीडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखाला कार्यकर्त्यांकडूनच शिवीगाळ
author img

By

Published : Apr 10, 2019, 11:16 AM IST

बीड - शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना मंगळवारी चौसाळा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनच शिवीगाळ झाल्याची घटना घडली. याबाबत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दुजोरा दिला आहे.

बीड लोकसभा मतदार संघात शिवसेना व भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे मंगळवारी चौसाळा येथे एका छावणीवर प्रचारासाठी गेले होते. यावेळी चौसाळा येथील एका ज्येष्ठ शिवसैनिक नेत्याबद्दल कुंडलिक खांडे यांनी काही दिवसापूर्वी अपशब्द काढले होते. यावरून मंगळवारी कुंडलिक खांडे यांना चौसाळा शिवसैनिकांनी शिवीगाळ केली असल्याची घटना घडली आहे. थेट शिवसेना जिल्हाप्रमुखांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच शिवीगाळ केल्याची पहिली घटना असल्याचे शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांकडूनच सांगितले जात आहे.

याबाबत कुंडलिक खांडे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, चौसाळा येथे प्रचाराच्या निमित्ताने मी गेलो होतो मात्र मला कुठल्याही प्रकारची कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ झालेली नाही. असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात कुंडलिक खांडे यांना शिवीगाळ झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. याबाबत बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, याबाबत मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुठला गुन्हा दाखल झाला नसल्याचे पुरभे यांनी सांगितले.

Intro:बातमीत वापरण्यासाठी चा बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा फोटो डेस्क च्या व्हाट्सअप चा ग्रुप वर सेंड केला आहे....
†********************
बीडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कार्यकर्त्यांकडूनच शिवीगाळ; प्रचारादरम्यान चौसाळा येथे घडला प्रकार

बीड- शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना मंगळवारी चौसाळा येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडूनच शिवीगाळ झाल्याची घटना घडली. याबाबत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दुजोरा दिला आहे.

Body:बीड लोकसभा मतदार संघात शिवसेना व भाजप च्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारा निमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे मंगळवारी चौसाळा येथे एका छावणीवर प्रचारासाठी गेले होते. यावेळी चौसाळा येथील एका ज्येष्ठ शिवसैनिक नेत्याबद्दल कुंडलिक खांडे यांनी काही दिवसापूर्वी अपशब्द काढले होते. या वरून मंगळवारी कुंडलिक खांडे यांना चौसाळा शिवसैनिकांनी शिवीगाळ केली असल्याची घटना घडली आहे. अशाप्रकारे थेट शिवसेना जिल्हाप्रमुख यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच शिवीगाळ केल्याची इतिहासातील पहिली घटना असल्याचे शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांकडूनच सांगितले जात आहे.

Conclusion:याबाबत कुंडलिक खांडे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, चौसाळा येथे प्रचाराच्या निमित्ताने मी गेलो होतो मात्र मला कुठल्याही प्रकारची कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ झालेली नाही. असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. मात्र सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात कुंडलिक खांडे यांना शिवीगाळ झाल्याचे व्हायरल झाले होते. याबाबत बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता याबाबत मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कुठला गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती माध्यमांशी बोलताना पुरभे यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.