बीड - जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ७ रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार या गावापासून ३ कि.मी. परिसरातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावापासून ३ कि.मी. परिसरातील ( सांगवी पाटण, खिळद, पाटण, कोहीनी, कारखेलतांडा ) हा परिसर कटेंनमेंट म्हणून घोषित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
कंटेनमेंट झोनच्या पुढील ०४ कि.मी. परिसरातील लिंचोडी, धामणगांव, सुर्डी, कारखेल बु., डोईठाण, वाची, लाटेवाडी व महाजनवाडी हि गांवे बफर झोन (Buffer zone) म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.