बीड : मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील जामगाव येथील निवृत्तीराव धस विघालयातील कबड्डीचे खेळाडू या खेळाडूंनी लातूर येथे जिल्हा क्रीडा संकुलनात झालेल्या 17 वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेत निवृत्तीराव धस विद्यालयाच्या संघाने नऊ गुणांच्या फरकाने लातूर संघाचा पराभव करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. विजयी खेळाडूंचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार केला. या संघाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला परंतु राष्ट्रीय स्पर्धा होत नसल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया कबड्डी संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंनी दिली आहे.
काय म्हणतात प्रशिक्षक : स्पर्धा होत आहेत पण राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होत नाही. खेळाडूंचे फार मोठे नुकसान होत आहे. खेळाडू राष्ट्रीय स्पर्धा खेळले तर खेळाडूंना आरक्षण मिळते, राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही तर याचा तोटा खेळाडूंना सहन करावा लागतो. कोरोना काळात बंद पडलेल्या स्पर्धा यावर्षी चालू झाल्या स्पर्धा राज्यस्तरापर्यंतच सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर सुरू व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे.
खेळाडूचे फार मोठे नुकसान होत आहे : लातूर येथे झालेल्या 17 वर्षीय वयोगटांमध्ये, जामगाव या शाळेचा संघ प्रथम आला आहे. स्पर्धेमध्ये प्रथम मुंबई बरोबर पहिली मॅच झाली. आम्ही 10 गुणांनी विजय मिळवला सेमी फायनल कोल्हापूर संघ बरोबर झाली. 12 गुणांनी विजय मिळवला. त्यानंतर यजमान संघ लातूर संघाबरोबर आमची फायनलची मॅच झाली. या संघाला आम्ही नऊ गुणांनी पराभूत करून, प्रथम येण्याचा क्रमांक आम्ही मिळवला आहे. पण या स्पर्धा याच ठिकाणी थांबायला लागले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा झाल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा व्हायला हवे. नॅशनल यावर्षी नाही तर गेल्या तीन वर्षापासून नॅशनल स्पर्धा झालेल्या नाहीत. खेळाडूचे फार मोठे नुकसान होत आहे. यामध्ये प्रथम आल्यानंतर हे सर्व खेळाडू क्लास थ्रीला पात्र झालेले आहेत. पाच टक्के आरक्षण त्यांना मिळालेले आहे. जर झाले तर क्लास टू साठी ते पात्र होतात नॅशनल होणे गरजेचे आहे. ज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी व शासनाने या खेळाडूची व या खेळाची दखल घेतली पाहिजे असे खेळाडू म्हणाले.
क्रीडा मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा : मी अंडर शेव्हनटी नॅशनल खेळलो आहे. तर यावर्षी ज्युनिअर नॅशनल खेळलो आहे. निवृत्ती राव धस माध्यमिक शाळेमधून खेळलो आहे. बरोबर शाळेतील अजून काही खेळाडू होते ते सध्या प्रो खेळत आहेत आम्ही सर्वांनी राज्य फायनल स्पर्धा जिंकली आहे, पुढे नॅशनलची स्पर्धा होणे गरजेचा आहे. आता आम्हाला कळाले आहे की, स्पर्धा होणार नाही. त्यामुळे आमच्या सर्व खेळाडूंचा नुकसान होत आहे. गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होत नसल्यामुळे शालेय स्तरावरच्या खेळाडूंचे यामुळे नुकसान होत आहे. ही स्पर्धा क्रीडा मंत्र्यांनी पुढाकार घेऊन सुरू करावे अशी मागणी होते आहे.