ETV Bharat / state

बीडमध्ये रोहित पवारांनी साधला राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांशी संवाद; म्हणाले... - News about Beed NCP

शासननाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शरद पवार यांच्या विचारांवर हा पक्ष करत आहे असे रोहित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.

rohit-pawarani-interacts-with-young-ncp-workers-in-beed
बीडमध्ये रोहीत पवारांनी साधला राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांशी संवाद; म्हणाले...
author img

By

Published : Feb 3, 2020, 5:13 PM IST

बीड - शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शरद पवार यांच्या विचारांवर हा पक्ष काम करत आहे. गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, हे सरकार पूर्ण पाच वर्ष टिकण्यासाठी सत्तेत आले आहे. भाजपची पिलावळे लोकांमध्ये जाऊन चुकीचे वक्तव्य करत आहेत, त्यांच्याकडे लक्ष न देता विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व आमदार काम करत आहेत. असा विश्वास रोहित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.

बीडमध्ये रोहित पवारांनी साधला राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांशी संवाद; म्हणाले...

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, जनता जेव्हा अडचणीत असते तेव्हा वैयक्तिक पातळीवर जाऊन मदत करण्याची सवय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना लावलेली आहे. यापुढच्या काळात जेव्हा कधी कार्यकर्त्यांना अडचणी येतील, तेव्हा आमचे आमदार मदतीला धावून येण्यासाठी कटिबद्ध असतील.

बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Intro:बीडमध्ये रोहीत पवारांनी साधला राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांशी संवाद; म्हणाले...

बीड- शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शरद पवार यांच्या विचारांवर हा पक्ष काम करत आहे. गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, हे सरकार पूर्ण पाच वर्ष टिकण्यासाठी सत्तेत आले आहे. भाजपची पिलावळे लोकांमध्ये जाऊन चुकीचे वक्तव्य करत आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व आमदार काम करत आहेत. असा विश्वास रोहित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.

Body:यावेळी आ. संदीप क्षीरसागर, माजी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. सुनील धांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधीकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, जनता जेव्हा अडचणीत असते तेव्हा वैयक्तिक पातळीवर जाऊन मदत करण्याची सवय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्त्यांना लावलेली आहे. यापुढच्या काळात जेव्हा केव्हा कार्यकर्त्यांना अडचणी येतील तेव्हा आमचे आमदार मदतीला धावून येण्यासाठी कटिबद्ध असतील असे ते म्हणाले.

Conclusion:बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बीड चे आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.