आष्टी(बीड)- तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत गुरूवारी (दि.4) येथील तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षेतेखाली ही सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
- अनुसुचित जाती - पिंपरखेड, डोईठाण, खुंटेफळ(वा.), पारगाव (जो.), सुरुडी, वाहिरा.
- अ.जा. (महिला) - चिंचोली,गहुखेल, क-हेवडगाव, क-हेवाडी, केरूळ, सावरगाव घाट, वाळुंज.
- अनुसुचित जमाती - चिखली.
- अ.ज. (महिला) - बळेवाडी, मांडवा.
- नामाप्र- बेलगाव, दौलावडगाव, डोंगरगण, गणगेवाडी, हनुमंतगाव, कापसी, लिंबोडी, निमगाव चोभा, पांगुळगव्हाण, पिंप्री घुमरी, सालेवडगाव, टाकळी आमिया, टाकळसिंग, हाकेवाडी, नागतळा, वंजारवाडी, खुंटेफळ पुंडी.
- नामाप्र (महिला)-आष्टा हरिनारायण, देवळाली, घोंगडेवाडी, हिवरा, जळगाव, कासारी, महिंदा, मंगरूळ, म्हसोबाचीवाडी, पांगरा, रुईनालकोल, साबलखेड, सराटेवडगाव, शेडाळा, शिरापूर, ठोंबळसांगवी, वटणवाडी.
- सर्वसाधारण- अंभोरा,बोरोडी, चिंचपूर, देसूर, देऊळगावघाट, कुंबेफळ, मोराळा, पांढरी, पाटसरा, पिंप्री आष्टी, सांगवी आष्टी, शेरीबुद्रुक, सुंबेवाडी, वेलतुरी, ब्रह्मगाव, चिंचाळा, दादेगाव, धनगरवाडी (डोईठाण), धनगरवाडी(पिंपळा), हाजीपूर, जामगाव, कानडी बुद्रुक, कानडी खुर्द, केळ, कोयाळ, मातकुळी, नांदा, निमगाव बोडखा, पिंपळगाव दाणी, पिंपळगाव घाट, पोखरी, सांगवी पाटण, शेरी खुर्द, शिराळ, सोलापूरवाडी, सुलेमान देवळा, तवलवाडी.
- सर्वसाधारण (महिला)- अरणविहिरा, फत्तेवडगाव, हातोळण, हिंगणी, केळसांगवी, खडकत, खरडगव्हाण, खिळद, किन्ही, पिंपळा, बांदखेल, बावी, बीडसांगवी, भाळवणी, भातोडी, दैठणा, देवीनिमगाव, धामणगाव, धानोरा, धिर्डी, घाटापिंप्री, हातोला, करंजी, कारखेल बुद्रुक, कारखेलखुर्द, कोहिनी, लमाणतांडा(वाटेफळ),लोणी(स.),मातावळी, नांदूर, पिंप्री घाटा, पुंडी, साकत, शेकापूर, उंदरखेल, वाघळुज, कडा, पारोडी असे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असल्याची माहिती तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी दिली आहे.