ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात तुरळक पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण - कृत्रिम पाऊस

बीड जिल्ह्यातील नेकनूर, मांजरसुंबा, चौसाळा, रायमोह, यासह बीड शहर परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस नैसर्गिक आहे की, कृत्रिम याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली.

बीड जिल्ह्यात तुरळक पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
author img

By

Published : Aug 21, 2019, 9:31 PM IST

बीड - दुष्काळाने त्रस्त जिल्ह्यात पावसाचे बुधवारी सायंकाळी आगमन झाले. बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

बीड जिल्ह्यात तुरळक पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
बीड जिल्ह्यात तुरळक पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
जिल्ह्यातील नेकनूर, मांजरसुंबा, चौसाळा, रायमोह, यासह बीड शहर परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाळ्याचे दोन महिने संपले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताक्रांत होता. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, उडीद व तुर ही पिक सुकून गेली आहेत. पिकांनी माना टाकल्याचे चित्र मागील आठवड्यापासून पाहायला मिळत होते. जुलै व ऑगस्टचा अर्धा महिना कोरडा गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
बीड शहराला पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. तर ग्रामीण भागांमध्ये भर पावसाळ्यात देखील पाण्याचे टँकर सुरू आहेत. अशा बिकट परिस्थितीत अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा कोसळत असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस नैसर्गिक आहे की, कृत्रिम याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली. परतीचा पाऊस मराठवाड्यात पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यात 144 सिंचन प्रकल्प आहेत यापैकी 103 सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. परतीच्या पावसावरच बीड जिल्हा अवलंबून असल्याने परतीच्या पावसाकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.

कृत्रिम पावसाची सोशल मीडियावर चर्चा-

मराठवाड्यावर कृत्रिम पाऊस पडणार आहे. ज्या जिल्ह्यात ढग दिसतील त्या जिल्ह्यातील नागरिकांनी तत्काळ प्रयोगशाळेला फोन करून कळवावे, अशी अफवा मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत होती. या अफवेबाबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी सायंकाळी स्पष्टीकरण देखील दिले आहे.

सोशल मीडियावर फिरत असलेला कृत्रिम पावसाचा मेसेज अफवा असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तरी देखील बुधवारी सायंकाळी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या नंतर हा पाऊस नैसर्गिक की, कृत्रिम अशी चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र, पाऊस नैसर्गिक असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचे आगमन; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

बीड- मागील दीड महिन्यापासून रुसलेल्या पावसाचे बुधवारी सायंकाळी आगमन झाले. बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळाले. मागील पावसाळ्याचे दोन महिने संपले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताक्रांत होता. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, उडीद व तुर सुकून गेली आहेत. पिकांनी माना टाकल्याचे चित्रा मागील आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. पिण्याच्या पाण्याचे वांदे आहेत. अशा बिकट परिस्थितीत अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा कोसळत असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले होते. बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस नैसर्गिक आहे की कृत्रिम याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाल्याचे पाहायला मिळाले.

जिल्ह्यातील नेकनूर, मांजरसुंबा, चौसाळा, रायमोह, यासह बीड शहर परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला असला तरी हळूहळू पावसाला पुन्हा सुरुवात झाली असल्याने समाधान आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. जुलै व ऑगस्टचा अर्धा महिना कोरडाठाक गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. बीड शहराला पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो तर ग्रामीण भागांमध्ये भर पावसाळ्यात देखील पाण्याचे टँकर सुरू आहेत. याशिवाय जनावरांच्या चाऱ्याची देखील आहे. या सगळ्या समस्येवर पाऊस हे एकच उत्तर आहे. हा पाऊसच गेल्या दीड महिन्यापासून गायब झाला होता. मात्र बुधवारी सायंकाळी पुन्हा वरुणराजाचे आगमन झाल्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये चांगला पाऊस पडेल आशी आपेक्षा आहे. काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. निदान परतीचा पाऊस तरी मराठवाड्यावर बरसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यात 144 सिंचन प्रकल्प आहेत यापैकी 103 सिंचन प्रकल्प आज घडीला कोरडेठाक पडले आहेत. परतीच्या पावसावरच बीड जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून असल्याने परतीच्या पावसाकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत..

कृत्रिम पावसाची सोशल मीडियावर चर्चा-
मागील आठ दिवसापासून मराठवाड्यावर कृत्रिम पाऊस पडणार आहे. व ज्या जिल्ह्यात ढग दिसतील त्या जिल्ह्यातील नागरिकांनी तात्काळ प्रयोगशाळेला फोन करून कळवावे. अशी अफवा मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत होती. विशेष म्हणजे या आफवेबाबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी सायंकाळी स्पष्टीकरण देखील दिले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेला कृत्रिम पावसाचा मेसेज अफवा असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. असे असले तरी देखील बुधवारी सायंकाळी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या नंतर हा पाऊस नैसर्गिक की कृत्रिम अशी चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र पाऊस नैसर्गिक असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.