ETV Bharat / state

बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू प्रचारही शिगेला पोहोचेल अशी परिस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

प्रीतम मुंडे, बजरंग सोनवणे
author img

By

Published : Mar 15, 2019, 11:28 PM IST

बीड - बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याची मोठी चर्चा गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात होती. अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपकडून प्रीतम मुंडे यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे अशी लढत होऊ शकते. गेल्या २ दिवसांपासून माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे नाव चर्चेत होते. मात्र ऐनवेळी पक्षाने बजरंग सोनवणे यांचे नाव जाहीर करून करून धक्कातंत्र वापरले आहे.

कोण आहेत बजरंग सोनवणे ?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे व शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून २०१२ पासून बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे काम करत आहेत. केज तालुक्यातील सारणी (आनंदगाव) हे त्यांचे मूळ गाव असून येडेश्वरी साखर कारखानाच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघाची नाळ पकडून ठेवले आहे. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच या पदापासून राजकारणाची त्यांची सुरुवात आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून ३ वेळा ते जिल्हा परिषद सभागृहात आलेले आहेत. तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, या शिवाय राजषी शाहू महाराज तालुका पतसंस्थेचे चेअरमन अशा विविध पदावर काम केले आहे. त्यांच्या पत्नी देखील जिल्हा परिषद सदस्य आहेत.

Intro:खालील बातमीतील बीड लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पासपोर्ट फोटो डेस्क च्या व्हाट्सअप नंबर वर सेंड केला आहे.
*******************

बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे रिंगणात; भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्याशी होणार लढत

बीड- बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याची मोठी चर्चा गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात होती. अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे अशी लढत बीड जिल्ह्यात होणार आहे. गेल्या दोन दिवसापासून माजी आ. अमरसिंह पंडित यांचे नाव चर्चेत होते मात्र ऐनवेळी पक्षाने बजरंग सोनवणे यांचे नाव जाहीर करून करून धक्कातंत्र वापरले आहे.

Body:कोण आहेत बजरंग सोनवणे-
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे व शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून 2012 पासून बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे काम करत आहेत. केज तालुक्यातील सारणी (आनंदगाव) हे त्यांचे मूळ गाव असून येडेश्वरी साखर कारखाना च्या माध्यमातून त्यांनी मतदार संघाची नाळ पकडून ठेवलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच या पदापासून राजकारणाची त्यांची सुरुवात आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून तीन वेळा ते जिल्हा परिषद सभागृहात आलेले आहेत. तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, या शिवाय राजषी शाहू महाराज तालुका पतसंस्थेचे चेअरमन अशा विविध पदावर काम करत असून सध्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सभापती म्हणून काम केल्याचा अनुभव असून सध्या त्यांची पत्नी देखील जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा परिषद काम पाहत आहे.

Conclusion:बीड लोकसभा मतदारसंघात अनेक दिवसापासून उमेदवार कोण? याची चर्चा होत होती. कारण तीन महिन्यापूर्वीच भाजपने डॉ. प्रीतम मुंडे आमचे बीड लोकसभेचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लवकर ठरत नसल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मागील काही दिवसापासून माजी आमदार अमरसिंह पंडित हेच बीड लोकसभेचे उमेदवार राष्ट्रवादीकडून असतील अशी चर्चा होती. मात्र अचानक बजरंग सोनवणे यांची उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर करून धक्कातंत्र वापरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू प्रचारही शिगेला पोहोचेल अशी परिस्थिती बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.