बीड- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली असून, पुणे पोलिसांचे पथक तपासासाठी बीड आणि यवतमाळला रवाना झाले आहे. हे पथक पूजाच्या मुळगावी जाऊन तपास करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पोलीस बीडला रवाना
दरम्यान पूजा चव्हाण हिने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतले होते का? याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. याचबरोबरच पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्याचं एक पथक बीडमध्ये दाखल झाले आहे. पोलीस महासंचालकांकडून या प्रकरणी जलद गतीने तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना मिळाल्यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला आहे. दरम्यान पूजाने पुण्यात आत्महत्या केली होती, मात्र तिच्या मुळगावी तिच्याबद्दल आणखी काही नवी माहिती मिळते का? याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक बीडमध्ये दाखल झाले आहे. यादरम्यान पूजा चव्हाणच्या संबंधित इतर व्यक्तीची चौकशी होण्याची देखील शक्यता आहे. तसेच धारावती तांडा येथे जाऊन अरुण राठोड याच्या घरच्यांची देखील पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हेही वाचा- टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती! पूजा चव्हाणचा प्रवास