ETV Bharat / state

परळी अंबाजोगाई रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी सुरू केला रस्ता रोको - bus

अनेक वर्षांपासून परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. ठेकेदाराने हा रस्ता खोदून ठेवला आहे.

बीड
author img

By

Published : Mar 10, 2019, 1:37 PM IST

बीड - परळी ते अंबाजोगाई हा १८ किलोमीटरचा रस्ता संबंधित ठेकेदाराने खोदून ठेवला आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यानंतर या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी नागरिकांनी रविवारी सकाळपासून रस्तारोको सुरू केला आहे. दीड ते दोन तासापासून हा रस्ता बंद असल्यामुळे लांब पल्ल्याच्या बसगाड्या अडकून पडल्या आहेत. अचानक झालेल्या रस्तारोकोमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली.

बीड

अनेक वर्षांपासून परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. ठेकेदाराने हा रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातीलच आहे. असे असतानाही रस्त्याचे काम रखडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. याशिवाय प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीला दूरवरून भाविक येतात, मात्र खराब रस्त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

यापूर्वी नागरिकांनी बॅनरच्या माध्यमातून परळी-अंबाजोगाई मार्गावर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा फोटो लावून हा रस्ता कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, याकडे एकाही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. त्यामुळे अखेर स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.

Intro:खालील बातमी चे विजवल डेस्क च्या व्हाट्सअप नंबर वर सेंड केले आहेत......

**********************
परळी अंबाजोगाई रस्त्याची मागणी करत नागरिकांनी आडवला मार्ग रस्ता रोको मुळे लांब पल्ल्याच्या गाड्या दीड तासापासुन ठप्प
बीड- परळी अंबाजोगाई हा 18 किलोमीटरचा रस्ता संबंधित गुत्तेदाराने खोदून ठेवला आहे. या रस्त्याचे चे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करत रविवारी सकाळी साडेदहा पासून सर्वसामान्य नागरिकांनी वाहने भररस्त्यावर आडवी उभी करून रस्ता रोको सुरु केला. साधारणत दीड ते दोन तास तासापासून परळी अंबाजोगाई रस्ता बंद आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या बस गाड्या अडकून पडल्या आहेत. आणि अचानक रस्ता रोको सुरु केल्यामुळे पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

Body:मागील अनेक वर्षापासून परळी अंबाजोगाई रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे असे असताना देखील रस्त्याचे काम रखडले असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. याशिवाय प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीला मोठी दूरदूरवरून भाविक येतात मात्र त्यांना खराब रस्त्यामुळे दणके खातच प्रवास करावा लागतो.

Conclusion:यापूर्वी नागरिकांनी परळी अंबाजोगाई मार्गावर नितीन गडकरी यांचा मोठा फोटो लावून हा रस्ता कधी करणार असा प्रश्न बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केला होता. मात्र याकडे एकाही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावा या मागणीसाठी रविवारी सर्वसामान्य नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर अडवून रास्ता रोको सुरु केला. मागील दीड तासापासुन हा रस्ता रोको सुरु असून कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.