बीड - नांदेडकडून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या 'शर्मा ट्रॅव्हल्स' या खासगी बसला आग लागली. शुक्रवारी पहाटे तीनच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात, सांगवी पाटण येथे ही घटना घडली. चालकाने वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे बसमधील सर्व 34 प्रवासी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा... #CAA आंदोलनादरम्यान मुस्लिम व्यक्तीने वाचवले पोलिसाचे प्राण
अचानक आग लागलेल्या या आगीत बस (MH 20 N 9630) संपूर्ण जळून खाक झाली. पहाटेच्या वेळी सर्व प्रवासी झोपेत असताना, बसला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकाने बस तात्काळ थांबवली व प्रवाशांना बसच्या बाहेर काढले. शर्मा ट्रॅव्हल्स या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस आहे. या घटनेबाबत कडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, बसला नेमकी कशामुळे आग लागली हे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अशोक कचरू बोराडे (रा. परभणी) असे त्या बस चालकाचे नाव आहे.
हेही वाचा... पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात सरावादरम्यान दोघांचा मृत्यू