बीड : जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला (Political Leaders Electricity Bill Overdue) आहे. ज्या शेतकऱ्यांकडे गेल्यावर्षीची थकबाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे वीज बिल कट करणे, त्यांना वीजबलभार विज बिल भरा असे सक्ती महावितरण केली आहे. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील राजकीय नेते यांच्याकडे मात्र लाखोंची बिल थकल्याचे चित्र आपल्याला पाहायला (political leaders of Beed district) मिळते.
थकीत बिल : बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांच्याकडे 72 हजार 610 रुपये, माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे 60 हजार 130 रुपये, आमदार संदीप क्षिरसागर यांच्याकडे 1 लाख 2 हजार 160 रुपये ,भाजपचे आमदार माजी भीमराव धोंडे यांच्याकडे 1 लाख 57 हजार 420 रुपये, केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांच्याकडे 1 लाख 64 हजार 980 रुपये पत्नी मंगलताई सोळुंके यांच्याकडे 1 लाख 63 हजार 270 रुपये, त्याचबरोबर प्राजक्ता धस यांच्याकडे 44 हजार 460 रुपये, तर योगेश क्षिरसागर यांच्याकडे 1 लाख 45 हजार 660 रुपये बिल थकीत (leaders of Beed district Electricity bill) आहे.
सक्तीचे आदेश : मा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे विज बिल थकीत नसल्याचे पत्र धनंजय मुंडे यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हे आरोप केले आहेत. अशा प्रकारची थकबाकी नेत्यांकडे असताना विद्युत वितरण कंपनी मात्र नेत्यांची पाठराखण करते आणि शेतकऱ्यांचे वीज बिल कट करण्यात मात्र आगेकूच करताना पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे शेतकऱ्यांकडून विज बिल वसूल करा, असे सक्तीचे आदेशही देतात. मात्र त्यांना याच राजकीय नेत्यांचे विज बिल दिसत नाहीत का? असाच प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात (Beed district Electricity bill) आहे.