ETV Bharat / state

बीडमध्ये रेमडेसीवीरचा काळाबाजार ? इंजेक्शन साडेपाच हजारांना विकल्याची पोलिसात तक्रार

author img

By

Published : Apr 16, 2021, 1:47 AM IST

मेडिकलवाल्याने इंजेक्शनवर 5 हजार 400 इतकी किंमत असल्याचे सांगत त्यांच्याकडून दोन इंजेक्शनसाठी 10 हजार 800 रुपये घेतले. या प्रकाराकानंतर संतोष सोहनी यांनी बीड शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

Remdesivir
रेमडेसीवीर

बीड - जिल्ह्यात रेमडेसीवीरच्या काळ्या बाजाराबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. लाईफ लाईन हॉस्पिटलशी संलग्न लाईफलाईन मेडिकलमध्ये रेमडेसीवीरच्या एका इंजेक्शनसाठी 5 हजार 400 रुपये किंमत आकारण्यात आली. या किमतीवर दोन इंजेक्शन विकल्याचे गुरुवारी समोर आले आहे. या प्रकरणात इंजेक्शन खरेदी करणारे संतोष सोहनी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.

जिल्ह्यातच अन्न औषध प्रशासन विभागाच्या आशिर्वादानेच रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लाईफलाईन मेडिकलला रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा देण्यात आला होता. गुरुवारी संतोष सोहनी हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्या वेळी मेडिकलवाल्याने इंजेक्शनवर 5 हजार 400 इतकी किंमत असल्याचे सांगत त्यांच्याकडून दोन इंजेक्शनसाठी 10 हजार 800 रुपये घेतले. या प्रकाराकानंतर संतोष सोहनी यांनी बीड शहर पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणात चौकशी करून पुढील कारवाई होईल असे शहर पोलीसांनी सांगितले.

हेही वाचा-'सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका करणारे भाजपा नेते दळभद्री'

औषध निरीक्षकाची भूमिका संशयास्पद?

रेमडेसीवीरच्या किंमतीवर महाराष्ट्रात मर्यादा घालण्यात आलेली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री 1,400 रुपयापेक्षा अधिक किमतीला हे इंजेक्शन विकता येणार नाहीत, असे वारंवार सांगत आले आहेत. याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाला आहे. यापेक्षा अधिक किमतीने हे इंजेक्शन विकले जाऊ नये, हे पाहण्याची जबाबदारी अन्न औषध प्रशासनाची आहे. मात्र, बीड शहर पोलीसात 5 हजार 400 रुपयांनी इंजेक्शन विकल्याची तक्रार आल्यानंतरही औषध निरीक्षक रामेश्‍वर डोईफोडे कुठलीही ठोस भूमिका न घेता निघून गेले.

हेही वाचा-राज्यात संचारबंदीला सुरूवात; जाणून घ्या कोरोनासंबंधीच्या ताज्या घडामोडी..

एमआरपीपेक्षा जास्त किंमत घेतली नाही- डोईफोडे
एकंदरीत या सर्व प्रकाराबद्दल अन्न औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांना विचारले असता ते म्हणाले. मेडिकल चालकाने रेमडेसीवीर इंजेक्शन एमआरपीच्या किमतीनुसार विकलेले आहे. दुकानदाराला इंजेक्शन चौदाशे ते पंधराशे रुपयांमध्ये मिळते. मात्र, त्या इंजेक्शनवर पाच ते साडेपाच हजार रुपयांची एमआरपी आहे. दुकानदार एमआरपीनुसारच इंजेक्शन विकणार असल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.