ETV Bharat / state

आष्टी; आरोग्य विभागाच्या जागेत खोदले खड्डे; जागा हडपण्याचा प्रयत्न - आष्टी; आरोग्य विभाग न्यूज

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दादेगांव आरोग्य उपकेंद्र आहे. याच उपकेंद्रांची दहा गुठ्ठे जागा आहे. मात्र, या जागेवर संरक्षण भिंत नसल्याने मोकळा परिसर आहे. त्यामुळे काही अज्ञात  लोकांनी बुधवारी खड्डे खोदुन या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

आरोग्य विभागाच्या जागेत खोदले खड्डे
आरोग्य विभागाच्या जागेत खोदले खड्डे
author img

By

Published : Feb 21, 2021, 5:04 PM IST

आष्टी(बीड)- आरोग्य विभागाच्या जागेत खड्डे खोदून काही जणांनी अतिक्रमण करत शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टीतील दादेगाव येथे घडला आहे. हे अतिक्रमण थांबवून योग्य कारवाई करावी अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी तहसीलदार, आष्टीचे उपअधीक्षक, गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

आरोग्य केंद्राची जागा हडपण्याचा प्रकार
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दादेगांव आरोग्य उपकेंद्र आहे. याच उपकेंद्रांची दहा गुठ्ठे जागा आहे. मात्र, या जागेवर संरक्षण भिंत नसल्याने मोकळा परिसर आहे. त्यामुळे काही अज्ञात लोकांनी बुधवारी खड्डे खोदुन या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती आरोग्य विभागाला समजताच तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्पाॅट पाहणी केली . तेव्हा खड्डे हे आरोग्य विभागाच्या जागेतच खोदल्याचे लक्षात येताच तहसिलदार, आष्टीचे उपअधीक्षक, गटविकास अधिकारी यांच्याकडे अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदरील जागेत खड्डे खोदून अतिक्रमण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. नितीन मोरे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.