बीड - परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण भावात अटीतटीची लढत सुरू आहे. एक दुसऱ्यावर वार पलटवार होऊ लागले आहेत. मतदारसंघातील घाटनांदुर येथील एका कॉर्नर बैठकीत बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावताना एक जोरदार विधान केले आहे. 'मोदीच काय ट्रम्प जरी परळीत आणला तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही', असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'बेरोजगारीवर प्रश्न विचाराल तर चोप मिळेल', चिमूर मतदारसंघातील खेड येथील घटना
ज्या दिवशी आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या दिवसापासून भाजपने माझी धास्ती घेतली आहे. त्यामुळेच परळीमध्ये नरेंद्र मोदींची सभा लावली आहे. पण परळीमध्ये नरेंद्र मोदीच काय अमेरिकेचे ट्रम्प जरी आले तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
हेही वाचा... स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हाच सत्ताधाऱ्यांचा धंदा - अजित पवार
'मोदीच आणि ट्रम्पही आपला विजय रोखू शकत नाही'
परळीत होणाऱ्या पराभवातून भाजपला मोदी बाहेर काढतील असे वाटत असल्यामुळे त्यांनी येत्या 17 तारखेला मोदी यांना परळीत बोलावले आहे. पण मी एवढेच सांगतो की, मोदीबरोबर अमेरिकेचे ट्रम्प जरी परळीत आले तरी आता परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास यावेळी मुंडेंनी बोलताना व्यक्त केला.