बीड - भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधान निवडणुकीत डावलण्यात आलं आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र भाजपा आणि बीड भाजपात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शनिवारपासून ( 11 जून ) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बीडमध्ये डेरे दाखल आहे. मात्र, भाजपाचा साधा एकही पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी गेला नाही. उलट आज ( 12 जून ) उस्मानाबादहून बीडकडे येताना चौसाळा येथे दरेकरांच्या गाडीचा फौजफाटा येत होता. तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी उभी राहिली नसल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी दरेकरांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला ( pankaja munde suppoter stop car pravin darekar ) आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे बीडमध्ये होते. पक्षाचा एक वरिष्ठ नेता बीडमध्ये आल्यानंतरही भाजपाच्या कुठल्याही पदाधिकार्याने दरेकर यांची भेट घेतली नाही. आज सकाळी एका कार्यक्रमासाठी दरेकर हे उस्मानाबादला गेले. परत ते सकाळी अकरा वाजता बीडसाठी निघाले. साडेबारा वाजण्याच्या सुमारास दरेकरांचा ताफा हा चौसाळा येथे आला. तेव्हा भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी तो ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरेकरांचा ताफा थेट पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलून बीडकडे निघाला. त्यानंतर संतापलेल्या चौसाळा येथील पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी दरेकरांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
हेही वाचा - Devendra Bhuyar Meet Sanjay Raut : अपक्ष आमदार देवेंद्र भुयार संजय राऊतांच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात!