ETV Bharat / state

Devendra Fadnvis in Beed : बीडमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिनींची अनुपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण - pankaja munde beed

आज बीडमध्ये शिवसंग्रामचा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम ( Addiction awareness rally ) पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnvis ) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. पण, या कार्यक्रमाला भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) व खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) अनुपस्थित ( Munde sister Absence in program ) असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुंडे भगिनींची अनुपस्थिती
मुंडे भगिनींची अनुपस्थिती
author img

By

Published : Dec 31, 2022, 3:47 PM IST

शिवसंग्रामचा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

बीड : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती रॅली ( Addiction awareness rally ) काढण्यात आली. स्व.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान आणि शिवसंग्राम संघटनेच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) हजर आहे. पण, बीडमध्ये कार्यक्रम असून खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) या गैरहजर ( Munde sister Absence in program ) असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मुंडे भगिनी नाराज? : भाजप पक्ष श्रेष्ठीचे नेते उपस्थित असताना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे कार्यक्रमात न आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना संधी न दिल्यामुळे पंकजा मुंडे कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी दिल्लीत जावून पक्षश्रेष्ठींची भेट सुद्धा घेतली होती. त्यानंतर पंकजा मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. आज बीडमध्ये फडणवीस आले असताना मुंडेंनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

व्यसनमुक्तीसाठी जनजागृती कार्यक्रम : दरम्यान, या जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यक्रत्ये सहभागी झाले आहेत. ज्योती मेटे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली. प्रत्येक वर्षी स्व.विनायक मेटे याच दिवशी व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीच आयोजन करत होते. पुढे आता ज्योती मेटे यांनी देखील या व्यसनमुक्ती जनजागृती आयोजन करून विनायक मेटे यांचा वैचारिक वारसा पुढे सुरू ठेवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.