ETV Bharat / state

जनसामान्यांचा पक्ष मूठभरांचा करू नका, पंकजा मुंडेंचा भाजप राज्य नेतृत्त्वाला अप्रत्यक्ष टोला

काही जण म्हणतात पंकजा मुंडे बंड करतात. पण बंड महत्त्वाचे असते. बंड केले नसते, तर देश स्वतंत्र झाला असता का? आज बंड करणाऱ्या नेत्यांची गरज असल्याचे पंकजा म्हणाल्या. त्यामुळे मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

pankaja munde on gopinath gad beed
पंकजा मुंडे
author img

By

Published : Dec 12, 2019, 4:52 PM IST

बीड - काही जण म्हणतात जमीन माझ्या बापाची आहे. पण, मी म्हणते पक्ष माझ्या बापाचा आहे. गोपीनाथ मुंडेंनी मूठभर असलेला पक्ष जनसामान्यांपर्यंत नेला. आता मात्र, तो जनसामान्यांचा पक्ष मूठभर करू नका, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्य नेतृत्वाला अप्रत्यक्ष टोला लगावला. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज (१२ डिसेंबर) गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन केले, यावेळी त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडेंचा भाजप राज्य नेतृत्त्वाला अप्रत्यक्ष टोला

मी पक्षाला ७ जागा मागितल्या होत्या. मात्र, पक्षाने फक्त मला माझी जागा दिली. पक्ष ही प्रक्रिया आहे. पक्ष बदलत नाही. मात्र, माणसे बदलत असतात. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो आणखी वाढावा, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, यानंतर मी भाजपच्या कोअर कमिटीची सद्स्य राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

हे वाचलं का? - पक्ष माझ्या बापाचा, मी का सोडू? रक्तात बेईमानी नाही, पंकजा मुंडेंचे सुचक इशारे

काही जण म्हणतात पंकजा मुंडे बंड करतात. पण बंड महत्त्वाचे असते. बंड केले नसते, तर देश स्वतंत्र झाला असता का? आज बंड करणाऱ्या नेत्यांची गरज असल्याचे पंकजा म्हणाल्या. त्यामुळे मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का? - '....मात्र, गोपीनाथ मुंडेंनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही'

पंकजा मुंडे पक्ष सोडणार? ही बातमी कोणी पसरवली. चंद्रकांत पाटलांनी चौकशी करावी. याबाबत सर्वांना उत्तर हवे आहे. ते पक्षाने द्यावे. मला असे वाटते, मला काही मिळत नाही म्हणून हे सर्व होत आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. पदासाठी हे होत असेल, तर मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. कारण गोपीनाथ मुंडेंच्या रक्तात बेईमानी नाही, असेही पंकजा म्हणाल्या.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.