ETV Bharat / state

Pankaja Munde News : दुसऱ्या पक्षात जाण्याएवढी मी लाचार नाही, दसरा मेळ्याव्यात पंकजा मुंडेंची गर्जना; नवीन पक्ष काढणार? - पंकजा मुंडे सावरगाव सभा

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावरील सभेत अनेक मुद्द्यांना हात घातला. मराठा, ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न आहे. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते, असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्या सावरगाव येथील सभेत बोलत होत्या. अनेक बाबतीत घुसमट व्यक्त करुन त्यांनी दुसऱ्या पक्षात न जाण्याचे संकेत दिले. त्यामुळे नवीन पक्ष काढणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Pankaja Munde News
Pankaja Munde News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 2:28 PM IST

Updated : Oct 24, 2023, 10:38 PM IST

पंकजा मुंडे यांचं भाषण

बीड : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज बीडमध्ये दसरा मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. मी जनतेची कर्जदार आहे. लोकांच्या मनामध्ये काहूर आहे. मी तुमची ताईसाहेब नसून आई असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. राजकारणात ताईपासून मी आईच्या भूमिकेत आहे. एकवेळ मी मेहनत करेल पण स्वाभिमान गहान टाकणार नसल्याचं मुंडे म्हणाल्या.

मी कधीही झुकणार नाही : तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी 2024 पर्यंत लढणार आहे. मी आता घरी बसणार नाही. उसतोड कामगारांना न्याय देऊ शकले नाही, असं त्या म्हणाल्या. पुढच्या दसऱ्याला ऊसतोड कामगारांना मी न्याय दिल्याशिवाय राहणार नसल्याचं मुंडे म्हणाल्या. दुसऱ्या पक्षात जाण्याएवढी मी लाचार नसल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ गड मी तीन महिन्यात बांधला. मात्र, सरकारनं गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बांधलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केलीय.

तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदानात : जाती-पातीच्या राजकारणाच्या भिंती तोडून आपण एक व्हायला हवं. मी पडले मात्र, मी आता पडणार नाही असा निर्धार त्यांनी केला. शेतकरी, बेरोजगारी, महागाईविरोधात जो काम करणार नाही, मी त्याला पाडणार असल्याचं पकंजा म्हणाल्या. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदानात आहे. तुमची जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत मला कोणीही हटवू शकणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. मी आता मौदानात राहणार आहे. मी घरी बसणार नाही. तुम्ही मला बळ द्या, मी कधीच कुणासमोर झुकणार नाही, माझ्या येणाऱ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहे असं मुंडे यांनी म्हटलंय.

तुमचे उपकार फिटणार नाही : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं सावरगाव येथील सभास्थळी दाखल झाल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, आपला आवाज पूर्ण देशात पोहोचला पाहिजे. सभेला राज्याच्या प्रत्येक भागातून लोक आले आहेत. मला कोणतं पद किंवा खुर्ची मिळाल्यानं तुम्ही आला आहात का? मी राजकारण करावं का? सोडून द्यावं? माझ्या कारखान्यावर जीएसटीची कारवाई झाली. तुम्ही निधीचा पाऊस पाडला. माझ्या आयुष्यात मी निवडणूक हरले. पण तुमच्या नजरेतून हरले नाही. पैसे वाढवून दिल्याशिवाय ऊसतोड कामगार कामावर जाणार नाहीत. आमच्या कातड्याचे जोडे केले तरी, तुमचे उपकार फिटणार नाही, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली केली.

हेही वाचा -

  1. Nilesh Rane Retirement: निलेश राणे यांची अचानक राजकारणातून कायमची निवृत्ती, 'हे' सांगितले कारण
  2. Dussehra 2023 : राजकीय स्वार्थापोटी अनिष्ट शक्तींशी युती करण्यात अविवेकीपणा -सरसंघचालक मोहन भागवत
  3. Shiv sena Melava on Dasara 2023: शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन, दोन्ही बाजूनं सोडले जाणार एकमेकांवर टीकेचे बाण

Last Updated : Oct 24, 2023, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.