बीड - परळी विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना-रासप-रिपाईं-रयतक्रांती महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी रॅलीला संबोधित केले. परळीत विरोधकांचे आव्हान नसून विजय आपलाच आहे, असा विश्वास यावेळी मुंडे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - अखेर मुंदडा कुटुंबीय भाजपात दाखल; केजमध्ये संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले?
पंकजा मुंडे म्हणाल्या, " मी राजकारणाला 2009 ला सुरुवात केली होती. अनेकांना वाटले होते मी राजकारणात टिकणार नाही. पण जनता सदैव माझ्या पाठीशी आहे. मी निर्भीड राहून काम केले हे परळीच्या जनतेला ठाऊक आहे, म्हणून मी आतापर्यंत टिकले. परळीच्या जनतेसाठी मी संघर्ष करतेय. मी शब्दला जागते, माझ्यावर विश्वास ठेवा" धनंजय मुंडे यांनी कायम गोपीनाथ मुंडेंना त्रास दिला, असा आरोप पंकजा यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गरळ ओकलेल्या लोकांना परळीची जनता विसरणार नाही. पंकजा मुंडे हे परळीचे सुरक्षा कवच आहे ते कधीही निघू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - माझी लढाई परळीचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी - धनंजय मुंडे
गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याअगोदर परळीतील निवासस्थानी पंकजा मुंडे यांचं औक्षण करण्यात आले. पंकजाच्या या रॅलीला खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे, माजी आमदार गोविंद केंद्रे आणि इतर नेते उपस्थित होते.

Intro:Body:
[10/3, 6:16 PM] Vankatesh Vaishnav, Beed: मी माझ्या राजकारणाला 2009 ला सुरुवात केली होती अनेकांना वाटलं होतं की राजकारणात टिकते की नाही
[10/3, 6:17 PM] Vankatesh Vaishnav, Beed: पण सदैव जनता माझ्या पाठीशी आहे म्हणून मी आता पर्यंत टिकले आहे
[10/3, 6:18 PM] Vankatesh Vaishnav, Beed: मी निर्भीड राहून काम केले आहे ते परळी च्या जनतेला ठाऊक आहे
[10/3, 6:19 PM] Vankatesh Vaishnav, Beed: आज जनतेची उपस्थिती पाहून मला भारावून आले आहे
[10/3, 6:19 PM] Vankatesh Vaishnav, Beed: काही विरोधक म्हणतात की मी भावनिक राजकारण करते
[10/3, 6:20 PM] Vankatesh Vaishnav, Beed: पण मी तसे कधीच करत नाही
[10/3, 6:20 PM] Vankatesh Vaishnav, Beed: परळीच्या जनतेसाठी मी संघर्ष करतेय
[10/3, 6:21 PM] Vankatesh Vaishnav, Beed: मी कधीच गोपीनाथ मुंडे यांचे नाव विसरू देणार नाही....
[10/3, 6:22 PM] Vankatesh Vaishnav, Beed: गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात गरळ ओकलेल्या व्यक्तींना परली ची जनता विसरणार नाही
[10/3, 6:23 PM] Vankatesh Vaishnav, Beed: धनंजय मुंडे यांनी कायम गोपीनाथ मुंडे साहेबांना त्रासच दिलेला आहे
[10/3, 6:23 PM] Vankatesh Vaishnav, Beed: झेंडू बॉम्ब लावून रडत विरोधक मते मागत आहेत..
[10/3, 6:25 PM] Vankatesh Vaishnav, Beed: माझे महिला बचत गटाचे काम पाहून नरेंद्र मोदी यांनी देखील मला आशीर्वाद दिले आहेत
[10/3, 6:26 PM] Vankatesh Vaishnav, Beed: कार्यकर्त्यांच्या केसाला जरी कोणी धक्का लावला तर मी खपवून घेणार नाही
[10/3, 6:27 PM] Vankatesh Vaishnav, Beed: पंकजा मुंडे हे परळीचे सुरक्षा कवच आहे ते कधीही निघू देणार नाही...
[10/3, 6:28 PM] Vankatesh Vaishnav, Beed: मी शब्दला जागते....माझ्यावर विश्वास ठेवा
[10/3, 6:30 PM] Vankatesh Vaishnav, Beed: बीडचे उदाहरण माहीत आहे...ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांना पक्ष्याने तिकीट दिले नाही... असे म्हणत नाव न घेता आ. विनायक मेटे यांच्यावर पंकजा यांनी टीका केली....
[10/3, 6:32 PM] Vankatesh Vaishnav, Beed: अनेकांच्या अडचणीला मी धावून जात आहे... जनतेला माझ्या पाठीशी उभे राहावे लागेल....
[10/3, 6:32 PM] Vankatesh Vaishnav, Beed: 90% महिला माझ्या पाठीशी आहेत...
[10/3, 6:33 PM] Vankatesh Vaishnav, Beed: पंकजा तर निवडून येणारच पण राज्यातले भाजप उमेदवार पण निवडून आणणार
[10/3, 6:34 PM] Vankatesh Vaishnav, Beed: माज्या पाठीशी उभे राहा
[10/3, 6:34 PM] Vankatesh Vaishnav, Beed: भाषण संपले
Conclusion: